काकणेवाडीत युवा नेते अमोल साळवे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

काकणेवाडी करांचे काम तालुक्याला दिशादर्शक :
पारनेर प्रतिनिधी :
काकणेवाडी येथे अनेक दिवसांपासून प्रलंबित पाण्याचा प्रश्न अखेर पंचायत समितीच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर गणाच्या पंचायत समिती सदस्या सुप्रिया अमोल साळवे यांनी मार्गी लावला असून यासाठी काकणेवाडी येथील मुंबईकर तसेच स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी सुप्रिया अमोल साळवे यांच्याकडे पाण्याच्या प्रश्ना संदर्भात निधीसाठी पाठपुरावा केला होता.
दरम्यान काकणेवाडी येथे विहीर पाईपलाईन व पाण्याची टाकी साठी निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच काम मार्गी लागणार आहे या कामाचे भूमिपूजन युवा नेते अमोल साळवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना युवा नेते अमोल साळवे म्हणाले की काकणेवाडीकारांचे काम हे तालुक्याला दिशादर्शक असून सामाजिक कामाच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवले जात आहेत. काकणेवाडी येथे ग्रामविकासाची मोठी चळवळ उभी राहिली असून मुंबईस्थित उद्योजक गावात आदर्शवत सामाजिक उपक्रम राबवत आहेत. कार्यक्रम प्रसंगी यावेळी कान्हूर पठार पतसंस्थेचे संचालक भगवान वाळुंज, युवा नेते योगेश वाळुंज, जयवंतशेठ वाळुंज (उद्योजक मुंबई) सुभाषशेठ वाळुंज (उद्योजक मुंबई), साहेबराव नवले (उद्योजक मुंबई), गवरामशेठ वाळुंज (श्री स्वामी समर्थ द्वन्सपोर्ट, पुणे), नानासाहेब झावरे (उद्योजक मुंबई), बाबासाहेब वाळुंज (मुंबई पोलिस), अशोक वाळुंज (उद्योजक, मुंबई), दत्ताशेठ नवले (उद्योजक मुंबई), रविंद्र (अण्णा) वाळुंज (उद्योजक, मुंबई) किशोर सावळेराम वाळुंज (उद्योजक मुंबई), आप्पाशेठ वाळुंज (श्रीराम ट्रान्सपोर्ट, मुंबई), ग्रापंचायत सदस्य बाळासाहेब वाळुंज, गोरख वाळुंज, जयवंत बा.वाळूंज, इंजि. संचित मु. वाळुंज, शिवाजी वाळूंज, पोपट वाळूंज, संकेत वाळूंज, रविंद्र वाळूंज, राजेंद्र झावरे, आदी वाळूंज, बबन वाळूंज, संतोष वाळूंज, शिवाजी वि. वाळूंज, दत्तात्रय बं. वाळूंज, भास्कर वाळूंज, पोपट तु. वाळूंज, पांडुरंग वाळूंज विश्वनाथ वाळूंज, गुलाब गोपाळा सर, विजय गे. वाळुंज, रामदास पवार, संजय पवार, बाळासाहेब पवार, बाबासाहेब वाळूंज, पोपट वाळूंज गुरुजी, अर्जुन वाळूंज, बाळासाहेब वाळूंज, विष्णू वाळूंज, प्रवीण वाळूंज, रानू द. वाळूंज, ऋषिकेश वाळूंज, रामदास कि. वाळूंज, पत्रकार दत्ता ठुबे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पारनेर तालुका संघटक महेश झावरे, युवा सेनेचे संकेत झावरे आदी. काकणेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
:
काकणेवाडीच्या मुंबईस्थित ग्रामस्थांनी गावात आदर्श निर्माण केला
काकणेवाडी गावठाणात गेली अनेक वर्षे पाण्याची टंचाई निर्माण होत असल्यामुळे काकणेवाडी गावाचे रहिवासी असलेल्या परंतु सध्या कामा निमित्ताने मुंबई स्थायीक झालेल्या ग्रामस्थांनी यासाठी पुढाकारा घेत लोकसहभागातून स्वखर्च करुन सुमारे पाच लक्ष रुपये खर्च करुन विहीर खणली होती.त्यास विहीरीस मुबलक पाणी लागले होते.आता या विहीरीवर पाईप लाइन होणार असल्यामुळे गावठाणाचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. काकणेवाडी करांचे सामाजिक काम हे तालुक्याला दिशादर्शक आहे.