इतर
विद्युत मोटारी चोरणारे चोरटे मुद्देमाला सह जेरबंद!

राजूर पोलिसांची कारवाई
विलास तुपे
राजूर प्रतिनिधि
दि. 04/04/2022 रोजी फिर्यादी नामे पांडुरंग शंकर भांगरे, रा. पुरुषवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर यांनी राजुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, त्यांची पुरुषवाडी गावचे शिवारातील कुरकुंडी नदीचे किणाऱ्यावर बसवलेली ए.एम.यु. समरसेबल कंपणीची 7.5 हॉर्सपावरची इलेक्ट्रीक मोटार दि. 27/03/2022 रोजी ते दि. 04/04/2022 चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. वगैरे म॥ चे तक्रारीवरुन राजुर पोलीस स्टेशनला गु.र.नं 64/2022 भा.द.वी. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास राजुर पोलीस करित असताना खालील नमुद आरोपींनी सदर गुन्हा केल्याची माहिती मिळाली.
1)गणेश गोमा कोंडार,वय-30 वर्षे,
2)दिनेश पंढरीनाथ भांगरे, वय-22 वर्षे,
3)ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानदेव इंद्रजीत घोडे, वय-30 वर्षे,
4) गोरख त्रिंबक कोंडार, वय-25 वर्षे, सर्व रा. पुरुषवाडी, ता.अकोले
नमुद आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देवुन चोरी केलेला मुद्देमाल त्यांचेकडुन हस्तगत करण्यात आला आहे.
त्यांचकडे अधिक विचारपुस करता आरोपी क्र. 1 व 2 यांनी राजुर पोलीस स्टेशन गु.र.नं. 16/2022 भा.द.वी. कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील इलेक्ट्रीक मोटार चोरी केल्याची कबुली देवुन त्यांचे कडुन मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच यातील आरोपींकडे राजुर पोलीस स्टेशन गु.र.नं. 61/2022 भा.द.वी. कलम 457,380 प्रमाणे मधील चोरीस गेलेल्या रकमेबाबत अधिक चौकशी केली असता यातील आरोपी क्र. 4 नामे गोरख त्रिंबक कोंडार रा. पुरुषवाडी याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याचेकडुन 9,500/-रु. रोख रक्कम हस्तगत करण्यात आले आहे.
वर नमुद आरोपींकडुन खालील वर्णनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
1) 1,10,000/- रु. किमतीची एम.एच.14 पी. 4852 सिल्वर रंगाची मारुती व्हँन जु.वा.कि.अ.
2) 35,000/-रु. किमतीची ए.एम.यु. समरसेबल कंपणीची 7.5 हॉर्सपावरची इलेक्ट्रीक मोटार
3) 10,000/- रु. किमतीची इलेक्ट्रीक पानबुडी मोटार
4) 9,500/-रु. रोख रक्कम
एकुण 1,64,500/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री.मनोज पाटील सो. पोलीस अधिक्षक अहमदनगर, मा.श्रीमती स्वाती भोर मँडम, अप्पर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर व मा.श्री.राहुल मदने सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राजुर पोलीस स्टेशनचे अधिकारी सपोनि/नरेंद्र साबळे व अंमलदार- पोहेकॉ/559 कैलास नेहे, पोकॉ/विजय फटांगरे, पोकॉ/आकाश पवार,पोकॉ/अशोक काळे यांनी केली आहे.