खिरविरे येथे शाळापूर्व तयारी अभियान मेळावा साजरा.!

अकोले/प्रतिनिधी –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिरविरे येथे शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला
. याप्रसंगी येथे शाळापूर्व तयारी मेळाव्यास खिरविरे,कारवाडी,तिर्थाचीवाडी शाळेतील सर्व दाखल पात्र विद्यार्थी व पालक,शिक्षक, अंगणवाडी सेविका सहभागी झाले
खिरविरे बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी संभाजी झावरे यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खिरविरे केंद्राचे केंद्रप्रमुख विजय भांगरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटन खिरविरे गावचे प्रतिष्ठित नागरिक काळू बेणके यांनी केले.
केंद्र प्रमुख विजय भांगरे यांनी मार्गदर्शन केले.
सर्वांनी एकत्रित येऊन हा शाळापूर्व तयारी मेळावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र मुख्याध्यापक संजय भांगरे यांनी केले. मेळावा यशस्वीेतेसाठी वामन डगळे, राजू काळे नरेंद्र राठोड दिगम्बर वाकळे ,सखुबाई चौधरी द्रौपदा रावते। यमुना बेंडकोळी व मंदा डगळे शाळेतील शिक्षक व अंगणवाडी सेविका यांनी मेहनत घेतली…
