शिवसेना मा.नगरसेवक विशाल शिंदे व नगरसेविका विद्या गंधाडे खा.लंके यांच्या गोटात !

दत्ता ठुबे/ पारनेर दि.२३
भाजपच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष व पारनेर नगरपंचायतच्या नगरसेविका विद्या गंधाडे या लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल शिंदे यांनी खासदार निलेश लंके यांची साथ देण्याचा निर्णय घेतला असून त्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. विद्या गंधाडे यांचे चिरंजीव ऋषिकेश गंधाडे यांनी गुरुवारी खा. निलेश लंके यांची पारनेर मध्ये भेट घेऊन आपली आई तसेच आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले
.पारनेर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विद्या गंधाडे या शिवसेनेकडून विजयी झाल्या होत्या. राजकीय उलथा पालथीमध्ये गंधाडे व शिवसेनेचे काही नगरसेवक भाजपाचे तत्कालीन खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या समवेत गेले तर काही नगरसेवकांनी खासदार निलेश लंके यांना साथ देण्याचा निर्णय घेतला.
लोकसभा निवडणुकीत विद्या गंधाडे ,ऋषिकेश गंधाडे यांनी भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारास सहभाग घेत विखे यांना शहरातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतले होते .लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांचा पराभव झाल्यानंतर पारनेर नगरपंचायत साठी मंजूर करण्यात आलेली कामे रोखण्यात आली. कामे सुरू करण्यासाठी गंधाडे तसेच विखे समर्थक नगरसेवकांनी विखे यांच्याकडे पाठपुरावा केला मात्र विखे यांच्याकडून त्याच प्रतिसाद मिळाला नाही कोट्यावधी रुपयांच्या कामाची स्थगिती उठवण्यात आली नाही .त्यावर संबंधित नगरसेवकांनी विखे यांच्या विरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. नाराजीच्या पार्श्वभूमीवर गंधाडे यांनी खासदार निलेश लंके यांची भेट घेत आपण विनाअट राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काम करण्यास तयार असून आपण आपल्या आईसह पक्षास प्रवेश करण्यास तयार असल्याचे सांगितले.
लवकरच पारनेर येथे होणाऱ्या शरद पवार यांच्या सभेत गंधाडे ,शिंदे यांच्या सह पारनेर नगर तालुक्यातील अनेक प्रवेश होणार असल्याचे लंके समर्थक नगरसेवकाकडून सांगण्यात आले गंधाडे,शिंदे यांच्या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे ,जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर ,डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब कावरे, उपनगराध्यक्ष राजू शेख ,विजय डोळ रा.या.औटी,योगेश मते, बाजार समितीचे संचालक चंदन बळकट ,पारनेर शहराध्यक्ष वैभव गायकवाड, श्रीकांत चौरे ,सचिन नगरे ,सुभाष शिंदे ,दादा शेटे ,हिमानी नगरे, वैजयतां मते दिपाली औटी उपस्थित होते.