इतर

प्रत्येक गावाच्या ग्रामसभेत हे ठराव करावेत – सुशांत आरोटे


अकोले प्रतिनिधी :

अकोले तसेच जिल्हा भरातील सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की, आपल्या आपल्या गावात १मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ग्रामसभा वेगवेगळ्या तारखेला आयोजित केल्या जातात.या ग्रामसभेच्या निमित्ताने प्रत्येक गावाने खालील ठराव करून घ्यावेत आणि आपल्या जवळील कोणत्याही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना द्यावेत.असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशांत आरोटे यांनी केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी साहेब हे मागे शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने १० तास वीजपुरवठा विनाखंडीत मिळावा या मागणीसाठी १५ दिवस आंदोलनाला बसले होते.या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहेत आपला सगळ्या शेतकऱ्यांचा आवाज हा संघटितपणे शासन दरबारी पोहचवण्यासाठी आपण आपल्या गावात ग्रामसभेत पुढील ठराव करून घेऊन त्याची प्रत जवळील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आणून द्यावेत.
ठराव क्र.१- शेतमालास कायद्याने मंजूर हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये कोणालाही कमी किमतीत माल विकत घेता येणार नाही.अश्या स्वरूपाचा कायदा केंद्र सरकारने लागू करावा.
ठराव क्र २- शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने विनाखंडित वीजपुरवठा करण्यात यावा.
अश्या प्रकारचे ठराव प्रतेक गावाने घेऊन आपल्या जवळील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आणून द्यावेत अशी विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशांत आरोटे, उपाध्यक्ष सुनील पुंडे,कार्याध्यक्ष सुरेश नवले, आढळा विभाग अध्यक्ष पोपट आहेर, प्रवरा विभागातील ज्येष्ठ नेते श्री चंद्रकांत नेहे, एल, एम नवले,सोमनाथ आहेर, प्रशांत उगले, अशोक दातीर, आदी कार्यकर्त्यांनी केले आहे. तरी प्रत्येक गावातील शेतकरी बांधवांनी असे ठराव करावेत.


गावा गावातील सर्व शेतकरी बांधवांनी आपले ठराव करून जमा करून आणून देऊन शासन दरबारी आपला आवाज पोहचवा
– शुभम आंबरे
युवक तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना अकोले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button