नीलिमाताई पवार नाशिक भूषण पुरस्काराने सन्मानित!

नाशिक प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नासिक तर्फे दरवर्षी देण्यात येणारा अतिशय मानाचा पुरस्कार नाशिक भूषण पुरस्कार या वर्षी म.वि.प्र संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार यांना आज दिनांक १५ एप्रिल २०२२ रोजी कालिदास कलामंदिर नाशिक येथे एक रंगतदार कार्यक्रमात प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री हेमंत टकले (माजी विश्वस्त आणि सल्लागार कुसुमाग्रज प्रतिष्ठान , अध्यक्ष नॅब इंडिया) होते , तर प्रमुख उपस्थिती ज़िल्हा परिषद नाशिक च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांची असणार होती परंतु त्यांना पंतप्रधान कार्यालयातील मीटिंग साठी दिल्ल्लीला जावे लागले त्या या सोहळ्यास उपस्थित राहू शकल्या नाहीत पण त्यांनी ध्वनी फिती द्वारे संदेश पाठवून आपले मनोगत व्यक्त केले. त्यानी रोटरी व नीलीमाताईच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले आणि पूढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नाशिक भूषण पुरस्कार सोहळ्याची सुरवात नासिक रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ.श्रीया कुलकर्णी यांच्या अध्यक्षीय संभाषणाने झाली,त्यांनी या पुरस्काराची पार्श्वभुमी जमलेल्या श्रोत्यांना सांगितली.नाशिक भूषण पुरस्कार समितीचे अध्यक्ष रोटे. डॉ. राजेंद्र नेहेते यांनी नाशिक भूषण पुरस्कार कसा दिला जातो, समिती काय काय काम करते , कोणते निष्कर्ष असतात , पुरस्कार्थीचा सखोल अभ्यास करून मगच त्यांची निवड केली जाते , श्रीमती नीलिमाताई पवार यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्तुंन्ग कामा बद्दल आणि त्यांच्या समाजकार्याबद्दल त्यांची यापुरस्कारासाठी एकमताने निवड करण्यात आल्याचही त्यांनी सांगितले. डॉ सुनील संकलेचा यांनी नीलिमाताई ची अतिशय हृद्य ओळख करून दिली , ज्यात नीलिमाताईच्या बालपणापासून त्यांचं माहेर , त्यांचं शिक्षण , त्यांचा डॉ. वसंतराव पवार बरोबरचा विवाह , विवाह नंतर नीलिमाताईनी निभावलेली सासरकडची जबाबदारी , हॉस्पिटल मॅनेजमेंट चे घेतलेले शिक्षण , डॉक्टरांना दिलेला सपोर्ट आणि डॉक्टरांच्या नंतर अवघ्या १५ दिवसात संस्थेची घेतलेली जबाबदारी आणि त्यानंतर केलेले सत्कार्य , अशी हि ओळख अतिशय भावस्पर्शी होती , रोटे.अॅड. मनीष चिंधडेनी मानपत्राचे वाचन केले , अतिशय समर्पक शब्दात नीलिमाताईच्या कार्याचा गौरव या मानपत्रात नमूद केला आहे. मानपत्र , स्मृतिचिन्ह , शाल श्रीफळ , पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम रु.११०००/- अस या नाशिक भूषण पुरस्कारच स्वरूप होत. टाळ्याच्या गजरात , सर्व श्रोत्याने उभे राहून नीलिमाताईना वंदन करीत पुन्हा टाळ्यांच्या गजरात त्यांचं पुरस्कार घेता घेता आदराने उभे राहून कौतुक केले.
आपल्या पुरस्कारच अतिशय नम्रतेने मी स्वीकार करते. हा माझा स्वतःच्या घराचा सन्मान आहे , कारण डॉ वसंतराव पवार सुद्धा या रोटरी क्लब चे मेंबर होते आणि मी स्वतः रोटरी इनरव्हील ची सदस्य होती . हा मिळालेला सन्मान माझा एकट्याचा नसून हा सन्मान माझ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा , कर्मचाऱ्याचा सन्मान आहे. रोटरीने मला शिस्त शिकवली , मला समाजकार्याचे खरे स्वररूप येथे कळले , माझा छोट्याश्या कामाला दिलेला हा मोठा बहुमान आहे. आपण काम करीत राहावे , पुरस्कार साठी काम न करता काम अखंड सुरु ठेवावे कारण समाज मात्र आपल्याला बघत असतो. म वि प्र संस्थेला १०० वर्षाहुन अधिक असा इतिहास आहे , बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आमच ब्रीद वाक्य आहे आणि हि संस्था महात्मा ज्योतीबा फुलेनी सुरु केलेल्या शैक्षणिक चळवळीचा एक भाग असून आजही हि चळवळ तशीच सुरु आहे असेही त्यांनी सांगितले.संस्थेने जुन्या काळात मंदिरा मध्ये शाळा सुरु केल्या , गरीब घरातील मुले मुली शिक्षण घेण्या साठी शाळेत येऊ लागली ,पडक्या वाड्या मध्ये शाळा भरू लागली , त्या वेळी शिक्षकांचे पगार त्या वेळचे राजे महाराजे करीत असत , धार चे उदाजी राजे विशेष मदत करायचे.दस्तुरखुद्द शाहू महाराजांनी सुद्धा या संस्थे च्या शैक्षणिक चळवळी मध्ये सहभाग घेऊन शिक्षण सर्वाना मिळालं पाहिजे या साठी प्रयत्न केले. आज ह्या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे ४८७ शाखा , २१३००० विद्यार्थी , ६ डॉक्टरेट शिक्षक , १०००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत , सर्व शाळा मध्ये एकच प्रार्थना आणि एकच गणवेश असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढवता येईल यावर जास्त भर आहे.महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण ८५% आहे आणि त्यात म वि प्र चा वाटा ५०% आहे असं अभिमानाने त्यानीं सांगितले.मराठी हिंदी आणि इंग्लिश या भाषेवर प्रभूत्व असावं म्हणून संस्था विशेष प्रयत्नशील आहे. संस्थेने अनेक कार्यक्रमातून दिले जाणारे पुष्पगुछ देणे बंद केले ,त्या पैस्या चा सदुपयोग करून आलेल्या पाहुण्यांना पुस्तके दिली जातात , आजपावेतो ३८७२७ पुस्तक वाटप केले आहे. विद्यार्थ्या कडून विषमुक्त भाजीपाला पिकवूंन त्यांच्या कडूनच त्याची विक्री करून विद्यार्थ्यांना स्वावलंबनाची सवय लावली. संस्थेच्या भरभराटी बद्दल बोलताना त्यांनी सांगितले कि पैस्या ची चणचण असताना सुद्धा अतिशय काटकसरी ने , योग्य ऑडिट पद्धतीने होणाऱ्या खर्चावर नियंत्रण मिळवले , आज संस्थे कडे ७० कोटोच्या ठेवी आहेत , संस्थे कडे स्वताच्या बसेस आहेत , ३१० एकर ची जागा आहे स्वमालकीच्या ९६ इमारती आहेत ,२० लाख स्वेअर फीटचे बांधकाम केले गेलं आहे , मेडिकल कॉलेज मध्ये कॅथलॅब सुरु केले आहे , ११५००० झाडे लावली आहेत , संसथेचे बजेट आज ८०० कोटीच्या घरात आहेत , कोविड काळा मध्ये स्वॅब टेस्टिंग साठी स्टाफ अहोरात्र काम करीत होता. हि संस्था एक शिक्षण मंदिर आहे , देवाची कृपा आहे , लोकांचा लोभ आहे आणि विश्वास आहे , या जोरावर संस्थेची उत्तरोउत्तर प्रगती होत आहे असे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे श्री हेमंत टाकले यांनी आपल्या भाषणात नीलिमा ताईना हा पुरस्कार मिळाला हा स्त्रीशक्तीचा सन्मान आहे असे सांगितले , हा पुरस्कार देवून रोटरी सुद्धा सन्मानित झाली आहे . नीलिमाताईच्या संघर्षमय जीवन प्रवासाचा उलगडा त्यांनी केला , डॉक्टर वसंत पवारचं थक्क करणार काम , अविरत काम आणि निश्चय केला कि ते पूर्ण करण्यात पारंगत असलेले डॉक्टर या पाठीमागे नीलिमाताई ची भूमिका फार मोलाची आहे. त्याच स्वतःच एक शिक्षण विद्यापीठ आहेत , आज डिजिटल शिक्षणामुळे मुले शाळेत जाणे काय असते ते विसरली आहेत त्यातली मजा लुप्त पावते आहे , ह्युमन एलिमेंट सूध्दा लुप्त होत आहे आणि म वि प्र ने विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणावं अशी विनंती हि त्यांनी केली.स्वतःच एक रेडिओ स्टेशन सुरु करा , त्याद्वारे खेड्यापाड्यात रेडिओ द्वारे शिक्षण देता येईल , स्वतःच आत्म चरित्र लिहा असाही ते म्हणले , नीलिमाताई या विद्यामंदिरात समयी आहेत आणि समयी सारखं स्वतः जळत ज्ञानार्जन च अखंड काम त्या अविरत करीत आहे. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली , कार्यक्रमासाठी कालिदास कला मंदिर अपुरे पडले इतकी गर्दी झाली होती , नाशिक मधील अनेक मान्यवर , म वि प्र चे सभासद , पदाधिकारी ,रोटरी क्लब चे पदाधिकारी , सभासद , पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते