दोरखंड लघुपटाला राष्ट्रीय सर्वोत्तम भावनिक पुरस्कार

नाशिक प्रतिनिधी
डॉ शाम जाधव
सागर सिनेमा आर्ट मनमाड निर्मित दोरखंड लघुपटाने चौथे पारितोषिक पटकवीले आहे..२०२५ बुलढाणा राष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्तम भावनिक पारितोषिक मिळविले आहे
यापूर्वी नाशिक येथे महर्षी चित्रपट संस्थेच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दोरखंड लघुपटाला विशेष लघुपट पारितोषीक मिळाले . दुसरे पारितोषिक छत्रपती संभाजी नगर येथे रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट फिल्म पारितोषिक मिळाले… तिसरे पारितोषिक गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सामाजिक बेस्ट फिल्म (विनर) पारितोषिक मिळाले होते
आगामी होणाऱ्या सांगोला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दोरखंड लघुपटाला पारितोषिक नक्की पटका वेल असा विश्वास निर्माता दिग्दर्शक लेखक डॉ.हिरामण मनोहर यांनी व्यक्त केला आहे

सांगोला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल झाल्या नंतर दोरखंड लघुपट प्रेक्षकांना सागर आर्ट मनमाड या यु ट्यूब वर खुला करण्यात येईल….दोरखंड लघुपटाला मिळालेले घवघवीत यश म्हणजे प्रेक्षकांनी दिलेला आशिर्वाद असल्याचे निर्मात्याने म्हटले आहे
दोरखंड लघुपटात मुख्य कलाकार भुषण कश्यपे , ज्योती मेरे, आकांक्षा नवले, विकास काकडे, अजय बिरारी, गणेश रणशुर,बालकलाकार सम्यक पगारे,सतिष परदेशी, मास्टर अश्फाक आदींची भुमिका साकारलेली आहे…..