भगवानगड दंडकारण्य दुरण टेकडी वर वन्य प्राण्यांसाठी पाणवठे!

भगवानगड परिसर प्रेस क्लब चा उपक्रम
अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
भगवान गड परिसर प्रेस क्लब व वनपरिक्षेत्र कार्यालय पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने भगवानगड दंडकारण्य दुरण टेकडी येथील पानवठा साफसफाई करून त्यामध्ये वन्यप्राण्यांसाठी पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सुविधा केली त्याचबरोबर मान्सून ऋतू सुरू होण्यापूर्वी व पावसाळ्यापुर्वी दंडकारण्य क्षेत्रात वनसंवर्धन व्हावे व जास्तीत जास्त वृक्ष लागवड व्हावी या दृष्टीने विविध वृक्षाच्या जातीचे प्रजातीचे वृक्ष बीजारोपण करण्यात आले यावेळी श्री क्षेत्र सालसिद्धेश्वर संस्थान महंत ह भ प हनुमान महाराज शास्त्री पाथर्डी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर दौंड भगवानगड परिसर प्रेस क्लब अध्यक्ष लोकपत्रकार प्रा दादासाहेब खेडकर उपाध्यक्ष अशोक आव्हाड सचिव विजय शिवगजे कोषाध्यक्ष रमेश देवा जोशी सहसचिव किरण दादा शिरसाट कार्यकारणी सदस्य रवींद्र उगलमुगले कार्याध्यक्ष महादेव बटुळे संपर्कप्रमुख गणेश बोरुडे प्रसिद्धीप्रमुख नितीन अंदुरे भिमराव सुपेकर जनार्धन बोडखे मालेवाडी सरपंच आजिनाथ दराडे राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सदस्य किरण खेडकर मिडसांगवीचे सरपंच भगवान हजारे उपसरपंच विष्णू थोरात भाजपा अल्पसंख्यांक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रशीद तांबोळी वसंत खेडकर अंबादास दराडे वनकर्मचारी सविता रायकर सुधाकर घोडके भास्कर सोसे महादेव वारंगुळे मच्छिंद्र शेळके शिवाजी खेडकर बाळासाहेब बटुळे तसेच भगवानगड परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना सालसिद्धेश्वर संस्थान महंत ह भ प हनुमान महाराज शास्त्री यांनी समाजात अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत सामाजिक उपक्रम राबवणे आवश्यक असल्याचे सांगितले तसेच भगवानगड परिसर प्रेस क्लबच्या वन्य पशुपक्षी प्राण्यांसाठी केलेल्या पाणवठे पाणीपुरवठा वृक्ष बीजारोपण उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या
–
भगवान गड परिसर प्रेस क्लब ग्रामीण पत्रकारांसाठी व सामाजिक कार्यासाठी सर्व करत असलेली संघटना असून ऐन उन्हाळ्यात श्रीक्षेत्र भगवानगडाच्या दंडकारण्य जंगलात वन्य पशुपक्षी व प्राण्यांसाठी पाणवठ्यात पाणी पुरवठा व वन संवर्धनासाठी वृक्ष बीजारोपण केले असे सामाजिक उपक्रम भविष्यात सुद्धा भगवानगड परिसर प्रेस क्लब राबवत राहील- प्रा दादासाहेब खेडकर-
अध्यक्ष – भगवान गड परिसर प्रेस क्लब.
– मानव हा सजीव प्राणी असून आपल्या प्रमाणे पशुपक्षी वन्य प्राणी सुद्धा सजीव आहेत भगवानगड परिसर प्रेस क्लबच्या माध्यमातून वन्य पशु पक्षी प्राणी यांच्यासाठी पाणवठे पाणीपुरवठा व वृक्ष बीजारोपण करून सामाजिक संस्कृती व मानवतेचे दर्शन घडवले आह-
सुहास चव्हाण –
पोलीस निरीक्षक पाथर्डी पोलीस स्टेशन