शेंडी येथे जागतिक योग दिन साजरा!

भंडारदरा प्रतिनिधी
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी( ता अकोले) या विद्यालयात जागतिक योग दिवस तसेच इयत्ता 10 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेंडी गावचे विद्यमान सरपंच मा. दिलीप शेठ भांगरे हे होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री. दिलीप रोंगटे यांनी प्रास्ताविक करून जीवनात योगाचे महत्व स्पष्ट केले. तसेच विद्यालयातील इयत्ता 10 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. शेंडी गावचे सरपंच दिलीप भांगरे , तसेच विद्यालयाचे प्राचार्य, श्री. दिलीप रोंगटे यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यालयात अनुक्रमे विभागून प्रथम आलेल्या कु. महारनोर ऋतुराणी संजयकुमार, आणि कु. सोनवणे दीक्षा सुनील, द्वितीय कु. लोटे संध्या मारुती, तृतीय कु. सोनवणे दीक्षा शंकर, चतुर्थ चि. वाघमारे तेजस संतोष आणि विद्यालयात पाचवा चि. देशमुख ऋतिक शिवराम या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार केला.
विद्यालयात नव्याने बांधलेले लेडीज स्टाफ रूमचे उद्घाटन शेंडी गावचे सरपंच तथा शालेय व्यस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. दिलीप शेठ भांगरे, विद्यालयाचे प्राचार्य श्री. दिलीप रोंगटे, पुण्यनगरीचे पत्रकार श्री. संजयकुमार महारनोर व सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शासनाच्या राजस्व अभियानांतर्गत विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात जातीचे, उत्पन्नाचे व इतर शैक्षणिक कामासाठीचे आवश्यक दाखले वितरित करण्यात आले.
शेंडी गावचे भूषण तथा . जिल्हा परिषद मा अध्यक्ष . श्री. अशोकराव भांगरे यांना विद्यालयाच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन, जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. विद्यालयाचे क्रिडा शिक्षक श्री. बाबासाहेब वैद्य तसेच श्री. विकास आवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित सर्व मान्यवरांनी तसेच विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगासने केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक प्रा. महेश पाडेकर यांनी केले, तर आभार शिक्षक प्रा. संदीप महाडदेव
