इतर
माका सेवा सोसायटी निवडणुकीत मंत्री गडाख समर्थक आमने सामने!

दत्तात्रय शिंदे_
माका प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातील,माका विकास सेवा सहकारी सोसायटी संस्थेची संचालक मंडळाच्यानिवडणूकीसाठी रविवार दिनांक 8/5/2022 रोजी मतदान होणार आहे
मंकावती शेतकरी सहकार पॅनल व मंकावती सहकारी ग्रामविकास पॅनल अशा दोन गटात निवडणूक लढत होत आहे.
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख समर्थक असलेले कार्यकर्ते या निवडणुकीत आमने सामने आहेत रघुनाथ विश्वनाथ घुले तसेच गोरक्षनाथ हरीभाऊ घुले हे या गटांचे नेतृत्व करत आहे
सोसायटीच्या 13 जागेसाठी 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे मंत्री गडाख समर्थकांत होणाऱ्या या निवडणुकीकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.