जागतिक जादू परिषदेसाठी जादूगार हांडे कोलंबो ला रवाना

अकोले प्रतिनिधी
जागतिक जादू परिषदेला कोलंबो (श्रीलंका)
येथे २२ ते २७ एप्रिल २०२२ दरम्यान होणाऱ्या ‘जागतिक जादू परिषदेला’उपस्थित। राहण्यासाठी अकोले येथील जादूगार पी बी हांडे हे आज रवाना झाले
या जादूपरिषदेसाठी जगभरातील अनेक जादूगार उपस्थित राहणार आहे जादूगार पी बी हांडे यांनी ‘जादूची दुनिया’ या स्टेज वरील प्रयोगाचे पाच हजारांच्या वर कार्यक्रम केले आहेत. त्यातून मिळालेल्या मानधनातून अनेक सामाजिक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे. ‘रहस्य चमत्काराचे’
या अंधश्रद्धा निर्मूलन सप्रयोग व्याख्यानाचे शाळा, कॉलेजेस, सामाजिक संस्था, महिला संस्था, सामाजिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, यामध्ये ६५० पेक्षा जास्त प्रयोग करून गेले ३३ वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम ते सातत्याने करत आहेत. कला व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारच्या समाज कल्याण विभागाकडून मिळालेल्या पुरस्काराचे
सोबत विविध राज्यस्तरीय संस्था व राष्ट्रीय संस्था यांच्याकडून त्यांना १२७ पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
१४ जानेवारी २००८ रोजी राष्ट्रीय एकात्मतेसाठी व सामाजिक समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यासाठी त्यांनी खोपोली ते पनवेल हे ३५ किलोमीटर चे अंतर डोळ्यावर पट्टी बांधून मोटर सायकल चालवून राष्ट्रीय संदेश दिला.त्यांनी केलेल्या धाडसी उपक्रमाची दखल घेतली गेली असून त्याची ‘मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झालेली आहे.
जादू परिषदेला उपस्थित राहणन्या साठी ते आज अकोले येथून रवाना झाले
