यंदा चक्रीवादळे आणि अवकाळी पावसाचा धोका!

महागाई चा पारा वाढेल!
अकोले प्रतिनिधीं
यंदा शनिवारी पाडवा आल्याने यंदा वर्षी एप्रिल मे महिन्यात मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाचा फटका बसेल
शनिवारी 2 एप्रिल पासून नवीन वर्षाची सुरवात झाली (शोभननाम सवंतसंर )शनिवारच्या पाडव्याने सुरवात झालीआहे
यावर्षी घाट घाटमाथ्यावर अधिक पाऊस पडेल मात्र इतरत्र पाऊस कमी पडेल पश्चिमेकडील धरणे भरतील सन 2022 मध्ये रोग पीडा नष्ट होईल ,कोरोना संपेल राजा आणि प्रजा सुखी राहील मात्र धन धान्य कमी राहील. डोंगरकाठी पाऊस जास्त असल्याने भात पिके चांगली येतील तर तेलवर्गीय पिके कमी राहील पूर्व भागात पाऊस प्रमाण कमी राहील असे भाकित जोतिष अभ्यासक वाळीबा बाळा चौधरी यांनी केले आहे राजा व प्रजा सुखी राहील मात्र महागाई वाढेल ,तेल ,तूप ,गूळ यांची महागाई वाढेल धन धान्या चे उत्पादन कमी होईल शेजारी राष्ट्रांच्या कुरघोडी वाढेल मात्र कुरघोडी परतून लावल्या जातील वादळे भूकंप महागाई यांचा त्रास जनतेला सहन करावा लागेल असे भाकीत श्री वाळीबा चौधरी यांनी व्यक्त केले सहदेव भाडळी ग्रंथाच्या आधारे त्यांनी हे भाकीत केले आहे
तर सन 2023 वर्षात पाडवा बुधवारी येत असल्याने पाऊस पाणी चांगले राहील राजा प्रजा सुखी राहील मात्र रोग पीडा सोसावी लागेल असे त्यांनी म्हटले आहे
