
मंत्री गडाख समर्थकांचा भाजप प्रणित परिवर्तन ला दे धक्का!
सोनई-प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची असलेल्या निपाणी निमगाव सेवा सोसायटीच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा मंत्री ना.शंकरराव गडाख यांच्या गटाने सर्वांच्या सर्व १३ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले आहे.
एकूण १३ जागेसाठी २६ उमेदवार उभे होते, यात ३१० मतदार पैकी ३०६ मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले.मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते पाराजी आदमाणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळ विरुद्ध नेवासा तालुका भाजपचे दिव्यंग सेल अध्यक्ष वैद्यनाथ जाधव,कार्यकर्ते दिलीप जाधव,अविनाश चव्हाण यांच्या परिवर्तन जनसेवा पॅनल मंडळ यामध्ये एकास एक पॅनल मध्ये चुरशीची निवडणूक झाली.
यामध्ये एकनाथ आदमाणे, प्रकाश आदमाणे, सिंधुबाई आदमाणे,बंडू काकडे,दत्तू काकडे,कावेरी काकडे,पोपट काकडे,राजेंद्र पवार,शेषराव पवार,रेवणनाथ चव्हाण, रामनाथ गायकवाड,रमेश डोईफोडे, संजय निकाळजे,हे विजयी झाले आहेत.
या निवडणुकी प्रक्रियेत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून आर.एन. जहागीरदार व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून संदीप आदमाने यांनी काम पाहिले.
विजयी उमेदवाराचे ना.शंकरराव गडाख,जिल्हा परिषदेचे बांधकाम व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख,ह.भ.प.अतुल महाराज आदमाणे यांनी अभिनंदन केले आहे.
——— –