आजचे पंचांग व राशिभविष्य दि२१/०४/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख ०१ शके १९४४
दिनांक :- २१/०४/२०२२,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१०,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४६,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- पंचमी समाप्ति ११:१३,
नक्षत्र :- मूळ समाप्ति २१:५१,
योग :- परिघ समाप्ति १०:२१,
करण :- गरज समाप्ति २१:५६,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- मेष – अश्विनी,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- कुंभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०२:०३ ते ०३:३७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:१० ते ०७:४४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:२८ ते ०२:०३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:०३ ते ०३:३७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:१२ ते ०६:४६ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
भा. वैशाख मासारंभ, श्री चंद्रला देवीचा उत्सव, दग्ध ११:१३ नं., षष्ठी श्राद्ध,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख ०१ शके १९४४
दिनांक = २१/०४/२०२२
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
आत्मविश्वास वाढीस लागेल. ठामपणे विचार नोंदवाल. मैत्रीतील दुरावा वाढू देवू नये. नवीन संधीकडे लक्ष द्यावे. सढळ हाताने मदत कराल.
वृषभ
गप्पा गोष्टींमधून विनोद निर्मिती कराल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. कलेला पोषक वातावरण लाभेल. अचानक धनलाभ संभवतो. उत्तम विचार मांडाल.
मिथुन
काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. क्षणिक सौख्याने हुरळून जाऊ नका. जोडीदाराविषयी गैरसमज नकोत. कामातील क्षुल्लक चुका दुरूस्त करा. वरिष्ठांची मर्जी राखावी.
कर्क
नवीन मैत्रीचे संबंध जुळून येतील. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. कामाच्या ठिकाणी हयगय करू नका. क्षुल्लक गोष्टींमुळे मनस्ताप संभवतो. जोडीदाराच्या वागण्याचा शांतपणे विचार करावा.
सिंह
रेस जुगारापासून दूर राहावे. वादाचे मुद्दे टाळण्याचा प्रयत्न करावा. आलेली संधी सोडू नका. मुलांच्या समस्या समजून घ्याव्यात. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.
कन्या
घरगुती समस्या दूर कराव्यात. विरोधाला बळी पडू नका. चांगल्या संगतीत रमून जाल. नवे अनुभव गाठीशी बांधाल. वडीलधार्यांचा आशीर्वाद लाभेल.
तूळ
मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. भागीदारीतील लाभाकडे काटेकोरपणे लक्ष द्या. कष्ट करण्यास मागे पुढे पाहू नका.
वृश्चिक
नातेवाईकांचा विरोध वाढू शकतो. उत्साहाने कामे हाती घ्यावीत. खाण्या पिण्याची पथ्ये पाळावीत. उष्णतेचे विकार बळावू शकतात कौटुंबिक बाबींमध्ये विशेष लक्ष घालावे.
धनू
स्वभावातील हट्टीपणा कमी करण्याचा प्रयत्न करावा. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. कामे मनाजोगी पार पडतील. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. जुन्या कामात गुंतून पडाल.
मकर
मानसिक स्थैर्य जपावे. सामाजिक गोष्टींचे भान राखावे. फसवणुकीपासून सावध राहावे. घराबाहेर वावरतांना सतर्क राहा. बोलताना सारासार विचार करावा.
कुंभ
किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका. अहंभावनेने कामे करू नयेत. स्वत:च्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल. आततायी वागणे टाळावे. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा.
मीन
काही खर्च अचानक सामोरी येतील. घरातील कामासाठी वेळ काढाल. व्यावसायिक गोष्टींचे भान राखावे. हातातील कलेसाठी वेळ काढावा. मनातील वैर भावना काढून टाकावी.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर