इतर

रूंभोडी सेवा संस्थेवर शेतकरी विकास मंडळाचे वर्चस्व..!


अकोले प्रतिनिधी

… अकोले तालुक्यत राजकीय दृष्ट्या जागरूक असणाऱ्या रूंभोडी गावातील रूंभोडी सेवा संस्थेवर ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने सर्वच्या सर्व 12 जागांवर आपले निर्विवाद वर्चस्व मिळवले.

यापूर्वीची बिनविरोध निवडीची परंपरा यावेळी खंडित झाली. संस्थेच्या स्थापनेपासून दुसऱ्यांदा निवडणूक झाली ३५-४० वर्षापासून बिनविरोध निवडीच्या परंपरेला यावेळेस अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे ब्रेक मिळाला.

काही महिन्यापूर्वी झालेल्या बिनविरोध ग्रामपंचायत निवडीच्या काही जागांची किनार होती.12 जागांसाठी 17उमेदवारांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकरी विकास मंडळाचे 12 उमेदवार व दुसर्‍या गटाचे 5उमेदवार असे या निवडणुकीचे स्वरूप होते. संचालक मंडळातील अतुल लोहटे,मावळते अध्यक्ष पोपट बापू मालुंजकर,अनिल सावंत यांनी वन्स मोअर म्हणत पुन्हा निवडणूक लढवली व विजय मिळवला.
509 मतदारांपैकी 457 मतदारांनी मतदानाचा हक्क लPबजावला. पाच उमेदवारांनी वेगळा गट मांडल्याचे सभासदांच्या निदर्शनास आल्यानंतर सभासदांनी या पाचही विरोधी उमेदवारांना घरचा रस्ता दाखवत साफ नाकारले. मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी संदीप नेरे यांनी सर्व साधारण मतदारसंघातून अनिल देशमुख, अतुल लोहटे, दशरथ मालुंजकर,दिलीप मालुंजकर, नारायण मालुंजकर, पोपट मालुंजकर,अनिल सावंत, बाळासाहेब सावंत तर महिला राखीव मतदार संघातून माजी सरपंच बाळासाहेब मालुंजकर यांच्या संघटन कौशल्यामुळे सुनंदा देशमुख व मंजुळाबाई मालुंजकर यांना विजयाचा गुलाल घेता आला. इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून अरविंद भोत यांना सभासदांनी विजयी कौल दिला. तर अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून कुशाबा मधे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले. बिनविरोध निवडीची परंपरा मोडल्याने निवडणूक घेण्यासाठी संस्थेला दिड लाख रुपयाचा फटका बसला. प्रकाश देशमुख यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी परीश्रम घेतले.निवडीनंतर विजयी उमेदवारांची रुंभोडी चौकात विजयी मिरवणूक काढण्यात आली.
सोशल मीडिया मधुन विजयाचे श्रेय घेनाऱ्या एका पदाधिकाऱ्यांची विजयी उमेदवारांनी चांगली खरडपट्टी काढली.विजयाचे श्रेय सर्वांचे आहे. मात्र हा उताविळपणा केल्याने अनेकांनी त्या पदाधिकाऱ्या वर चांगलेच तोंडसुख घेतले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button