गणोरे येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता..

आमदार डॉ. लहामटे यांनी केले अखंड हरिनाम सप्ताहाचे कौतुक.
गणोरे प्रतिनिधी :- (सुशांत आरोटे)
कोव्हिडं काळा च्या दोन वर्षानंतर गणोरे ता अकोले येथे उत्साही। वातावरणात अखंड हरिनाम सप्ताह साजरा झाला
. गावातील संपूर्ण वातावरण अतिशय आध्यात्मिक, आनंदाचे वातावरण पसरले . गावातील सर्व जाती ,धर्मातील सर्व मिळून मोठ्या आनंदाने सहभागी झाले . सातही दिवस कीर्तन सेवा,प्रवचन सेवा,हरिपाठ,काकडा,भजन सर्व सेवा ,गाव पंगती अतिशय भारावलेल्या वातावरणात पार पडल्या.
गणोरे गावचा आदर्श अखंड हरिनाम सप्ताह हा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असून या अखंड हरिनाम सप्ताह साठी विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी अधिकारी कार्यकर्ते भेट देण्यासाठी येत असतात.त्याचाच भाग म्हणून या सप्त्याह साठी तिसऱ्या दिवशी अकोले तालुका पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.
” गावागावात अखंड हरिनाम सप्ताहात गावातील सर्व जाती धर्मातील सर्व लोक एकत्र येऊन हा सोहळा साजरा करतात. विश्व शांतीचा जगाला संदेश देणारे ज्ञानेश्वर महाराज ,जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी समाजातील अनेक चुकीच्या रूढी ,परंपरा यांवर आसुढ ओढले.याचेच अनुकरण करत गावागावात अखंड शांतता प्रस्थापित व्हावी,सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन गुण्या गोविंदाने नांदावे,याचाच संदेश सप्ताह निमित्ताने दिला जातो.याचा सर्वांनी अनुकरण करावे.”
– श्री मिथुन घुगे
(पोलिस निरीक्षक अकोले पोलीस स्टेशन)
ज्ञानेश्वरीच्या पारायाणाच्या सांगतेसाठी अकोलेचे लोकप्रिय आमदार डॉ किरण लहामटे यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली,यावेळी त्यांच्या सोबत चळवळीतील ज्येष्ठ नेते श्री विनय सावंत , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ अविनाश कानवडे,हेही उपस्थित होते. तसेच अकोले तालुका कृषी अधिकारी श्री कोष्टी,संगमनेर तालुका कृषी अधिकारी श्री प्रशांत गोसावी, आदी आधिकारि उपस्थित होते.या सर्व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून सांगता करण्यात आली.
या वेळी आमदार डॉ किरण लहामटे यांनी अखंड हरिनाम सप्ताहाचे कौतुक करत अकोले तालुका नव्हे तर जिल्ह्यात गणोरे गावच्या अखंड हरिनाम सप्ताह प्रसिद्ध असल्याचे सांगत तोंड भरून कौतुक केले.तसेच आमदार महोदय यांनी गावा साठी भजनी मंडळ साहित्य उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.त्याबद्दल संपूर्ण गावाने आमदार यांचे आभार मानले.
. काल्याचे कीर्तन सुरू असताना नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ सुधीर तांबे यांनी भेट देत अखंड हरिनाम सप्ताहाचे कौतुक केले. तसेच कोरोना योद्धा डॉ आरोटे यांनी भेट देत कौतुक केले
या अखंड हरिनाम सप्ताह तसेच नाम जप यज्ञ सोहळ्यात साठी गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी आपल्या आपल्या पद्धतीने जी जी सेवा करता येईल ती ती सेवा करत आपल्या वेगळ्या पणाचा ठसा उमटविला.