इतर

पारनेर तालुक्यात उत्साहाने घरोघरी फडकले तिंरगा ध्वज !.

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी :-
स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवास पारनेर तालुक्यात मोठ्या उत्साहाने सुरवात झाली शनिवारी सर्व शासकीय निमशासकिय कार्यालयासह शाळा विद्यालये व घरोघरी तिंरगे ध्वज फडकले .


स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवा निमित्ताने हर घर तिंरगा ध्वज या अभियानास शनिवारी ध्वज वंदनाने सुरवात झाली तालुक्यातील गावा गावात वाडी वस्तीवर अदिवासी पाड्यावर तिंरगा ध्वज फडकले . अनेक ठिकाणी तिंरगा मोटारसायकल राँली काढण्यात आली तर काही ठिकाणी तिंरगा ध्वजाची अंखड मिरवणूक काढण्यात आली . दवाखाने दुकाने व्यापारी संकुले वाहनांवर तिंरगे ध्वज दिसत होते .तर अनेक ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालये ऐतिहासिक वेशी वर तिरंगा रंगाची विद्युत रोषनाई करण्यात आली . तालुक्यात अनेक ठिकाणी देशभक्तीपर गीताच्या स्पर्धा रांगोळी स्पर्धा व आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत . तर काही ठिकाणी जनावरांच्या आरोग्य तपासण्या केल्या जात आहे .
शनिवारी दि १३ ते १५ आँगस्ट या काळात रोज ध्वजारोहन केले जाणार आसल्याने व घरोघरी तिंरगे ध्वज फडकवले जात आसल्याने संपूर्ण गावे तिंरगे मय झाले .शाळा विद्यालयेही स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करत आहेत या काळात शाळात विविध स्पर्धासह झांज व लेझीम पथके विविध कवायती करताना दिसत आहेत .

पारनेर तालुक्यात स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवाला मोठ्या दिमाखात सुरवात झाली असुन संपुर्ण तालुका तिंरगामय झाला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button