क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा ठाणे कारागृहामध्ये स्मृतीवंदनाचा कार्यक्रम
कल्याण दि 30
थोर स्वातंत्रसेनानी वीर राघोजी भांगरे यांच्या १७४ व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ज्या ठिकाणी राघोजी भांगरे
यांना फाशी दिली त्या ठिकाणी ठाणे कारागृहामध्ये स्मृतीवंदनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे
थोर स्वातंत्रसेनानी वीर राघोजी भांगरे यांचे उचित
स्मारक ठाणे कारागृहात व्हावे यासाठी कै. डॉ. गोविंद गारे व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नामुळे गेल्या २० वर्षापासून स्मृतीदिनाचा कार्यक्रम होत आहे.गेल्या २ वर्षापासून कोरोनाचे संकट होते म्हणून वीर राघोजी भांगरे यांचा स्मृतिदिन साजरा करु शकलो नाही. परंतु १७४ वा
स्मृतीदिन २ मे २०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता माजी मंत्री मधुकरराव पिचड, , यांच्या हस्ते
स्वांतत्रसेनानी वीर राघोजी भांगरे यांच्या स्मृतीस्तंभाला पुष्पमाला अर्पण करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी ठाण्याचे आमदार डॉ. निरंजन डावखरे आमदार संजय केळकर ,मनोहर डुंबरे गटनेता भाजपा हे उपस्थित राहणार आहेत.
ठाणे जेलमध्ये ठराविक लोकांनाच परवानगी देण्यात येणार आहे, त्यामुळे थोडयाच लोकांमध्ये ठाणे जेलमध्ये कार्यक्रम साजरा करण्याचे आयोजन केले आहे.
तरी सर्वांनी स्वांतत्रसेनानी वीर राघोजी भांगरे यांचा
पुण्यतिथी दिन गावोगावी साजरा करण्यात यावा. जेणेकरुन राघोजी भांगरे यांच्या प्रेरणादायी स्मृर्ती स्मरणात राहतील. आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे असे ठाणे चौकाला नाव दिलेले आहेत त्या चौकाचे स्मृतीबंदन मधुकरराव पिचड यांचे हस्ते होणार आहे.
सर्वांनी आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांची पुण्यतिथी गावोगावी साजरी करण्यात यावी.असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केले आहे