इतर

भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयात मेगा नोकरी मेळावा संपन्न 

संगमनेर प्रतिनिधी

थोरात महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे

 रोजगार  व प्रशिक्षण केंद्र व रिलायन्सफौंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

महाविद्यालया मध्ये दि. २० जानेवारी ते २७ जानेवारी २०२५ या कालावधीत ७ दिवसांचा रोजगार कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून यामध्ये  विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांकडून  विविध कोर्स पूर्ण करूनमुलाखती साठीविद्यार्थ्यांमध्ये आवश्यक कौशल्यचा मार्गदर्शन सदर  कार्यशाळेत केले.

     मंगळवार दि २८ जानेवारी २०२४ रोजी नोकरी मेळाव्यात राष्ट्रीय स्तरावरील Just dial, RV Finserve, Yashaswi, Pro Plan solution, Quess crop, softwergen technology, Yuvapolyprint&packnging industries ,elios management, Tata Toyo Radiator, Brembo Break India इ. कंपन्यांनी त्याच बरोबर कंपन्याचेव्यवस्थापक श्री. मा.आर.व्ही. शुभम ,सचिन चौधरी, मनीषा सोन्दागे , अस्मा जमादार यांनीही सहभाग नोंदवला होता.

     नोकरी मेळाव्यात कंपनी व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांचा मुलाखत घेऊन त्यांचे व्यक्तिमहत्व, संभाषण कौशल्य, संगणक ज्ञान आदी कौशल्यांचा चिकीत्सक अध्ययन करून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. या नोकरी मेळाव्या साठी महाविद्यालयातील355 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. यातून 178 विद्यार्थ्यांची निवड करण्यातआली.

        सदर नोकरी मेळाव्या साठी राज्याचे मा. महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात साहेब  यांनी कंपनी व्यवस्थापक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे  चेअरमन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेव सहभागी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बाळासाहेब वाघ, उपप्राचार्य डॉ.विलास कोल्हे, आयक्यूएसी समन्वयक डॉ.लक्ष्मण घायवट, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा.गणेश थोरात, महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button