डॉ. आंबेडकरांचे काम सर्व धर्मियांसाठी – सुजित झावरे पाटील

पुणेवाडी येथे समाज मंदिराचे लोकार्पण
पारनेर प्रतिनिधी :
पुणेवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात मध्ये साजरी करण्यात आली. यावेळी सुजीत झावरे पाटील व पारनेर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगरसेविका हिमानीताई नगरे या उपस्थित होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा झावरे पाटील यांच्या हस्ते यावेळी संपन्न करण्यात आला. यावेळी बोलताना सुजीत झावरे पाटील म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजासाठी मोठे काम केले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना व इतर महापुरुषांना समाजाच्या चौकटीत बांधणे चुकीचे असून सर्व समाजाला एक समजून समाज हितासाठी त्यांनी केलेले कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांचे समाजहिताचे कार्य हे सर्व धर्मियांसाठीचे आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य युवा नेते अमोल साळवे, नगरसेविका हिमानीताई नगरे, भारतीय जनता पार्टीचे पारनेर शहर अध्यक्ष किरण कोकाटे पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मारुती रेपाळे, पुणेवाडीचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब रेपाळे, वासुंदे ग्रामपंचायत सदस्य विलास साठे सर, श्रीनाथ शिक्षण संस्था अध्यक्ष शांताराम सोनावणे, विजयानंद साळवे, बाळासाहेब रेपाळे, युवा नेते पंकज सोनवणे, चेअरमन बाबा रेपाळे, सुहास पुजारी, सचिन साठे, संदीप औटी, पांडुरंग मामा औटी, बाळासाहेब शेटे, किरण साठे, अक्षय साठे, दीपक साठे, रवी साठे, राजेश साठे, पप्पू आरने, तुषार सोनावणे, बाळासाहेब सोनावणे, राजेंद्र करंदीकर, निलेश सोनावणे, विशाल सोनावणे, विजय शीरसाठ, भागा सोनावणे, कचरू सोनावणे, किरण सोनावणे, आनंद सोनावणे, भरत सोनावणे, शरद म्हस्के, संदीप ठोंबे, राहुल ठोंबे मयूर शिंदे, सिद्धांत थोरात, मिलन चव्हाण, तसेच समाज बांधव व परिसरातील ग्रामस्थ उपस्थितीत होते.
..