इतर

मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात – मनोज जरांगे पाटील

१ डिसेंबर पासून प्रत्येक गावात साखळी उपोषण करा


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी


मराठा आरक्षण आता टप्प्यात येऊन ठेपले आहे त्यामुळे समाज बांधवांनी कोठेही जातीय तणाव होणार नाही या दृष्टीने दक्ष राहणे आवश्यक आहे जीव गेला तरी आपण आपल्या मागणी पासून एक इंच ही मागे सरकणार नाही. काहींनी त्यामुळे आखलेले षडयंत्र यशस्वी होणार नाही. यासाठी सर्वांनी आपली एकजूट कायम ठेवावी मागणीच्या पाठपुराव्यासाठी मराठा समाज बांधवांनी ताकतीने एकत्र राहणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या एक डिसेंबर पासून गावागावात साखळी उपोषण आंदोलन सुरू करावे मात्र समाजात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहील. यासाठी सर्वांनी दक्ष राहण्याची आवश्यकता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील पाथर्डी रस्त्यावरील साई लॉन्स मंगल कार्यालयात पार पडलेल्या महाविराट सभेत जरांगे पाटील बोलत होते.

दुपारी एक वाजता सुरू होणारी जाहीर सभा संध्याकाळी पाचच्या दरम्यान सुरू झाली. तरीही सभेसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

रस्त्यात ठीक ठिकाणी उत्साही कार्यकर्त्यांनी तसेच संत गाडगेबाबा चौकापासून जेसीबीतून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

जरांगे पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले की केवळ नोंदी नाहीत व पुरावे नाही. त्यामुळे मराठा समाज शिक्षण आणि नोकरीत गेली ७५ वर्ष उपेक्षित राहिला.

  • नगर जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाखाच्या पुढे नोंदी मिळाल्या असून त्याचा दहा ते पंधरा लाख लोकांना फायदा होईल राज्यात आतापर्यंत ३२ लाख नोंदी मिळाल्या असून पावणेदोन कोटी लोकांना त्याचा लाभ मिळू शकतो. जर मराठा समाजाला वेळीच आरक्षण मिळाले असते तर मराठा जात जगाच्या पाठीवर एक प्रगतशील जात म्हणून ओळखली गेली असती. पुरावे नाहीत नोंदी नाहीत. असे म्हणून आज पर्यंत आरक्षण मिळाले नाही.

आरक्षण नसल्याने पालक व त्यांची मुले अशा दोघांचेही स्वप्न भंग झाले आहे. प्रसंगी कर्ज काढून कष्ट करून आपल्या मुलाला शिकविले त्यामुळे कधीतरी सुख आपल्या पदरात पडेल आणि आपले दारिद्र्य संपेल हे मराठा समाजाचे स्वप्न स्वप्न राहिल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आपली येवल्याची सभा संपल्यानंतर त्या ठिकाणी पोस्टर फाडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काहीजण वेडी वाकडे विधाने करून आडवे येण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावी. जबाबदारीच्या पदावर कार्यरत असल्याने त्यांनी स्वतःला आवर घालावी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नका, आपले लक्ष विचलित करण्याचे काहींचे प्रयत्न उधळून लावण्याचे व त्यासाठी आपली एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. मराठा आंदोलनातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचे सहकारी प्रदीपदादा सोळुंखे यांनी प्रारंभी मराठा आरक्षणाच्या बाबत आपले मुद्देसूद विचार व्यक्त केले.

भातकुडगाव फाटा चौफुल्यावरही जंगी स्वागत


संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे तालुक्यातील शेवगाव – नेवासा राजमार्गावरील भायगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर भातकुडगाव फाटा चौफुल्या वर परिसरातील आमरण व साखळी उपोषणकर्त्यांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले.घोषणा व फटाक्यांच्या अतिषबाजीने परिसर दणाणुन गेला होता. यावेळी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणकर्त्यांची संवाद साधला.भातकुगावफाटा परिसरातील सकल मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button