बदगी गावचे सार्वजनिक विहीर खोली करणासाठी 10 लक्ष ची तरतूद – रमेश काका देशमुख
अखेर बदगी गावाची पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा संपली …
अकोले- अकोले तालुक्यातील कोतूळ जिल्हा परिषद गटातील बदगी गावाचा अनेक वर्ष प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जिल्हा परिषद अहमदनगर च्या.माध्यमातून मार्गी लागला असून या गावातील विहीर खोली कारणासाठी 10 लक्ष रुपयाची तरतूद केली या कामाचे उद्घाटन आज झाले असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य श्री रमेश काका देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे
तालुक्यातील बदगी हे गाव मुळा विभागातील शेवटचे टोक समजले जाणारे आहे या गावातील मुख्य पिण्याच्या पाण्यासाठी जो स्रोत होता ते म्हणजे गावाची सार्वजनिक विहीर ही गेल्या अनेक वर्षांपासून गाडली होती काही वर्षापूर्वी या विहीर मधे दगड माती ,गेल्याने ही विहीर पूर्णतः गाडली गेली होती तेव्हा पासून या गावाला पिण्याच्या पाण्याचा जो मुख्य स्रोत होता तो या विहिरीच्या माध्यमातून बंद पडला होता गेली अनेक वर्ष या गावातील नागरिकांना गावात असलेल्या एका छोट्याशा हात पंपावर आपली तहान भागवली। जात रोज सकाळी महिला भगिनींना सकाळी आपले भांडे घेऊन पाणी आणण्यासाठी हात पंपावर नंबर लावून पाणी आनावे लागत होते मुबलक पाणी आल्याने हे गावातील क्षेत्र पूर्णतः जिरायती आहे .गावाला पिण्याच्या पाण्यासाठी मुख्य स्रोत नसलेले हे तालुक्यातील पाहिले गाव आहे गेली अनेक वर्ष या गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी खूप संघर्ष केला एका हात पंपावर आख्या गावाने आजवर आपली तहान भागवली .सर्वच नागरिकांची केली अनेक वर्षांपासून ची आपेक्षा होती की गावातील मुख्य स्रोत समजले जाणारे विहिरीचे काम झाले पाहिजे .तिथे खोलीकरण झाले तर यात मुबलक पाणी साठा निर्माण होईल मात्र सर्वच या कडे काना डोळा करत होते गेली अनेक वर्ष या प्रश्नाकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नाही आजवर च्या अनेक निवडणुका या प्रश्नावर झाल्या मात्र प्रश्न मार्गी लावला नाही आज अखेर जिल्हा परिषद अहमदनगर तसेच स्थानिक विकास निधीतून हे काम मंजूर करण्यात आले असून या कामासाठी विहिरीच्या दुरुस्ती साठी 10 लक्ष रुपये ची तरतूद केली आहे .गेली अनेक वर्ष या गावातील सर्वच नागरिक एका छोट्याशा हात पंपावर अवलंबून होती .पिण्याच्या पाण्यासाठी जो संघर्ष करावा लागत होता तो आता येणाऱ्या काळात थांबणार असून पुढील आठवड्यात या कामाचे प्रतेक्ष्रित्या काम सुरू होणार आहे गेली अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा संपणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य श्री रमेश काका देशमुख यांनी दिली आहे
या उद्घाटन सोहळ्यासाठी माजी उपसभापती श्री मारुती मेंगाळ, श्री दिपक कासार, सरपंच प्रणेश शिंगोटे, उपसरपंच धीरज शिंगोटे, भूषण शिंगोटे, बाबाजी शिंगोटे, नामदेव शिंगोटे, सचिन शिंगोटे, गोपीनाथ शिंगोटे, प्रविण शिंगोटे, संभाजी शिंगोटे, कारभारी शिंगोटे, संपत शिंगोटे ,भानुदास शिंगोटे, किसन शिंगोटे, संपत आवटी ,भानुदास शिंगोटे,सोपान बोडके या सहित आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते