इतर

शेतक-यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करा !
आ.निलेश लंके

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी :
शेतक-यांनी शेतक-यांसाठी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करा व शेतमालावर प्रक्रिया करा जेणे करुन शेतक-यांना त्यांच्या शेतमालाला वाजवी दर मिळेल व त्यांच्या शेतमालाला त्यांना किंमत ठरवता येईल तसेच शेतक-यांची मुल त्यांना रोजगार मिळेल असे आमदार निलेश लंके म्हटले आहे त्यानी तालुक्याच्या खरीप नियोजन आढावा सभेला उद्येशुन सांगितले.

कृषि विभागाने जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन कराव्यात असेही त्यांनी सांगितले.
कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी चांगले काम करतात व त्यांनी शेतक-यांन पर्यंत सर्व योजना पोहचवीले आहेत असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
खरीप हंगाम नियोजन आढावा सभा २०२३-२४ मध्ये करण्यात आलेले नियोजन व मागील वर्षी झालेले कामे या बद्दल पी .पी .टी . व्दारे उपस्थितांना सविस्तर माहिती व महाडिबीटी अंतर्गत कृषि विभागाच्या विविध घटकातंर्गत बाबी वाटप केल्या किती शेतक-यांना लाभ दिला याबद्दलही माहिती तालुका कृषि अधिकारी, पारनेर श्री. विलास गायकवाड यांनी सदर आढावा बैठकीत आमदार लंके व उपस्थितांना दिली.
पंचायत समिती विभाग पारनेर यांच्या योजने बद्दल सविस्तर माहिती गट विकास अधिकारी श्री.किशोर माने साहेब यांनी दिली.तसेच पिक स्पर्धा यामध्ये क्रमांक आलेले शेतकरी तसेच प्रगतशील शेतकरी व चांगले काम केलेले अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार मा.आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला.

आत्मा अंतर्गत खरीप २०२३ कृषि प्रात्यक्षिक मध्ये मटकी बियानेवाण आर .एम .ओ . २२५१ शेतक-यांना वाटप करण्यात आले.महाडिबीटीअंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, हारव्हेस्टर ई लाभ मिळालेले शेतक-यांना आमदार निलेश लंके  यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कृषि विभागातील कृषि सेवक यांनी आपल्या मानधन वाढीसाठी आमदार निलेश लंके  यांना निवदेन दिले.
खरीप हंगाम नियोजन आढावा सभेला  नायब तहसिलदार श्री. सुभाष कदम,पारनेर,गट विकास अधिकारी श्री.किशोर माने साहेब, उपविभागीय कृषि अधिकारी .अ.नगर श्री. नवले साहेब, तालुका कृषि अधिकारी पारनेर श्री.विलास गायकवाड, तसेच शेतकरी व कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी या वेळी मोठ्या संखेने उपस्थित होते.
सर्व शेतकरी व कर्मचारी यांना खरीप हंगाम २०२३ ला सामोरे जान्यासाठी शेतकरी बांधवांना त्यांच्या दैनंदिन कार्यास मदत मिळावी म्हणून अधिकारी वर्गाने शेतकरी बांधवांना मार्गदर्शन व पारदर्शक सहकार्य द्यावे असे सुचित करत आमदार निलेश लंके यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button