महाराष्ट्र

पारनेरात युवक काँग्रेसच्या वतीने भाजप हटाव चा नारा

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा नोंदवला निषेध

दत्ता ठुबे
पारनेर:-काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ या ठिकाणी गावठाण चौकात पारनेर युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश शिंदे यांचा नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या वतीने निषेध निदर्शने करण्यात आली. “भाजपा हटाव देश बचाव, मोदी सरकार चले जावो “च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी पारनेर युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश शिंदे म्हणाले सध्या राहुल गांधींच्या खासदारकी रद्द केली कारण राहुल गांधी सतत लोकसभेत मोदी सरकारला धारेवर धरले आहे ,त्यांचे असणारे भ्रष्टाचार व अन्याय बाहेर काढत आहे ,त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्याची जी कृतीकेली ती बेकायदेशीर आहे .त्यामुळे देशात हुकूमशाही आल्यासारखे वाटत आहे. देशातील जनता ती होऊ देणार नाही असे या वेळी बोलताना पारनेर युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश शिंदे म्हणाले.
ज्या पद्धतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवून अपात्र ठरवले त्यामुळे लोकशाहीचे भवितव्य, विरोधी मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य घटनात्मक संस्थांच्या अस्तित्वाबाबत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत असा आरोप त्यांनी केला.
यावेळी वडगाव सावताळ चेअरमन दादाभाऊ रोकडे, वडगाव सावताळ युवक काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानदेव रोकडे, उपाध्यक्ष गणेश गायकवाड, अनिकेत पाचपुते, विजय रोकडे, दादाभाऊ शिंदे, सुनील रोकडे, गंगाराम व्यवहारे, गणेश रोकडे, राधुजी शिंदे, बाळू नरवडे, प्रसन्न रोकडे, संतोष रोकडे,संदीप व्यवहारे, प्रदीप रोकडे, तुकाराम साळुंके, विठ्ठल खंडाळे, अशोक शेवंते, गुलाब केदारी, तुकाराम रोकडे, शिवा भनगडे,सूर्यभान शिंदे, किसन रोकडे, बाळू रोकडे, शंकर चौरे,विश्वनाथ रोकडे, सीताराम रोकडे, देवराम शिंदे, दत्तात्रय शिंदे,कुंडलिक जाधव, विठ्ठल जाधव, नामदेव वाव्हळ व अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button