राघोजी भांगरे यांना ठाणे जेलमध्ये आदरांजली

अकोले, ता.३:आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांना ज्या जेलमध्ये फाशी दिली त्या ठिकाणी काल दि.2 मे 2022 रोजी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आदराजंली अर्पण केली.
यावेळी ठाण्याचे आमदार डॉ.निरंजन डावखर, आमदार मा.संजय केळकर, ठाणे महानगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते .मनोहर डुंबरे, लक्ष्मण साबळे, रामनाथ भोजणे, वंसत पिचड, मुरलीधर पिचड, पुणे जिल्ह्राचे तुळशिराम भोईर, गोविंद साबळे, डॉ.सुपे, तळपे साहेब, मोखाडयाचे सभापती व उपसभापती, तसेच ठाणे जिल्ह्राचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. ठाणे जेलमध्ये कै.आर.आर.पाटील यांच्या कृपेने कोनशिला बसविली आहे ती कोनशिला मोडकळीस आल्यामुळे चांगल्या दर्जाची नविन कोलशिला बसविण्यात यावी असे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी सकाळी 8 वाजता मा.ना.दिलीपराव वळसे पाटील यांना फोनद्वारे कळविले.
स्वातंत्र्यवीरांना ठाणे जेलमध्ये फाशी दिली आहे त्यांचे पुतळे बसाविण्यात यावे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी आदराजंली वाहून त्यांचा सन्मान करावा. राज्य शासनाने स्वातंत्र्यवीरांचे स्मारक उभारण्याचे कबुल केले आहे. ठाणे महानगरपालिकेने आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे चौकात सुशोभिकरण करुन आदराजंली अर्पण केली. यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड, आमदार निरंजन डावखरे, आमदार मा.संजय केळकर, ठाणे महानगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते मा.मनोहर डुंबरे यांच्या सह महाराष्ट्रातील मोठया संख्येने कार्यकर्ते हजर होते. ठाणे महानगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते मा.मनोहर डुंबरे यांनी कबुल केले की, आदिवासी पाडा आहे तिथे आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांचे स्मारक एक वर्षात उभारण्यात येईल.
आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांच्या पुढील वर्षी 175 व्या आदराजंली च्या कार्यक्रमा निमित्त माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी मा.ना.दिलीपराव वळसे पाटील यांना विनंती केली की, पुढील वर्षी आपल्या हस्ते कार्यक्रम व्हावा व तसे वळसे पाटील यांनी मान्य केले. कै.डॉ.गोविंद गारे या लेखकाने आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांचा इतिहास शोधून काढून त्यांच्या स्मृतीस वंदन करण्याचा कार्यक्रम कै.डॉ.गोविंद गारे व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी सुरु केला आहे त्यास 25 वर्ष पूर्ण होणार असून हा योगायोग आहे. हे दोन्ही कार्यक्रम या प्रसंगी होणार आहे. शेवटी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी महाराष्ट्रातील आदिवासी बांधवाच्या वतीने आदराजंली अर्पण केली.
