आजचे पंचांग व राशिभविष्य दि ४/५/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख १४ शके १९४४
दिनांक :- ०४/०५/२०२२,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०२,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५०,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति ०७:३३,
नक्षत्र :- मृग समाप्ति अहोरात्र,
योग :- अतिगंड समाप्ति १७:०६,
करण :- वणिज समाप्ति २०:४६,
चंद्र राशि :- वृषभ,(१६:४६नं. मिथुन),
रविराशि – नक्षत्र :- मेष – भरणी,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- शुभ दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:२६ ते ०२:०२ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:०२ ते ०७:३८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:३८ ते ०९:१४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५० ते १२:२६ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:१४ ते ०६:५० पर्यंत,
❀ दिन विशेष:-
तिसरी तीज, विनायक चतुर्थी, दग्ध ०७:३३ प., भद्रा २०:४६ नं., चतुर्थी श्राद्ध,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख १४ शके १९४४
दिनांक = ०४/०५/२०२२
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडाल. अनाठायी खर्च केला जाईल. कलात्मक दृष्टिकोन ठेवावा. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल. सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल.
वृषभ
चारचौघांत मिळून मिसळून वागाल. मनाप्रमाणे हौस पूर्ण करून घ्याल. काम व वेळ यांचे गणित जमवावे लागेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. अनावश्यक खर्च टाळावा.
मिथुन
गरज नसलेल्या वस्तू खरेदी केल्या जातील. मानसिक गोंधळ टाळावा. प्रलोभनाला भुलून जाऊ नका. स्त्री सौख्याचा लाभ होईल. प्रवासाचा योग येईल.
कर्क
चैनीच्या वस्तू खरेदी कराल. व्यापारी वर्ग अपेक्षित लाभाने खुश राहील. जवळचे मित्र भेटतील. मनमोकळ्या गप्पा मारल्या जातील. मनातील अपेक्षा पूर्ण होतील.
सिंह
कामातून आनंद मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कामातील सुसंगतता व स्थैर्य जपाल. वडीलधार्यांचा आशीर्वाद लाभेल. कामाच्या ठिकाणी तुमचा मान वाढेल.
कन्या
धार्मिक ग्रंथ वाचाल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. फक्त कामावरच लक्ष केंद्रीत करावे. वरिष्ठांच्या नाराजीचे कारण बनू नका. दिरंगाईतून मार्ग काढावा लागेल.
तूळ
हातातील वेळेचा सदुपयोग करा. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. आर्थिक व्यवहार जपून करावेत. उगाचच चीड-चीड करू नका. नसते साहस अंगाशी येऊ शकते.
वृश्चिक
कौटुंबिक कलह शांततेने सोडवावा. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. भागिदारीतून चांगला लाभ होईल. संपर्कातील लोकांकडून मदत मिळेल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल.
धनू
अडचणीतून वेळीच मार्ग निघेल. सहकार्यांची योग्य वेळी मदत मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. मनातील काळजी दूर होईल.
मकर
मुलांचे वागणे बिनधास्त वाटू शकते. आपले कलागुण जतन करण्याचा प्रयत्न करावा. बोलतांना इतरांचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहावे. संयम सोडू नका.
कुंभ
बर्याच गोष्टी सामोपचाराने हाताळाव्यात. वडीलधार्याच्या तब्येतीची काळजी घ्यावी. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. कौटुंबिक जिव्हाळा जतन करावा. थोरांचे विचार जाणून घ्यावेत.
मीन
जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. मित्रमंडळींचा गोतावळा जमवाल. वादाचे मुद्दे लांब ठेवावेत. सामुदायिक जाणीव जागृत ठेवावी. हाती घेतलेले काम तडीस न्याल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर