नेप्तीत आयोध्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त मिरवणूक, महाप्रसाद, कार सेवकांचा सन्मान.

अहिल्यानगर – नगर तालुक्यातील नेप्ती येथे नेप्ती ग्रामस्थांच्या व एकच कार्य समाज कार्य यांच्या वतीने आयोध्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. गावातून बजरंग साऊंड यांच्या डीजेच्या गजरात प्रभू रामचंद्रच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली .कार सेवेत सहभागी असलेले गावचे सुपुत्र *विष्णू गुंजाळ व कै. दिलीप चौगुले यांचा मुलगा प्रवीण दिलीप चौगुले यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून सन्मान करण्यात आला. तर कै. दिलीप चौगुले यांच्या आठवणीला उजाळा देण्यात आला. अशी माहिती रामदास फुले यांनी दिली .
श्रीराम मंदिर परिसर स्वच्छ करून मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. मिरवणुकीच्या स्वागतासाठी महिलांनी घरासमोर सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या .गावातील महिला व पुरुषांनी श्रीराम जानकी बैठे है मेरे सीनेमे ..रामजी की निकली सवारी..या व इतर गाण्यावर ठेका धरला होता तसेच जय श्रीरामाच्या घोषणेने गावचा परिसर दणदणून निघाला होता. हातात भगवे झेंडे घेऊन युवक आनंदाने नाचत होती .श्रीराम मंदिराच्या पटांगणात दिपोत्सव साजरा करण्यात आला. अभिषेक, होमहवन, भजन आदी धार्मिक कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फटाकड्याची आतषबाजी करून दिवाळी साजरी करण्यात आली.

महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हजारो राम भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भजनी मंडळांनी प्रभू श्रीरामाची भजनी गायली .या ठिकाणी उपस्थित सर्वजण मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन झाले होते.
या कार्यक्रमात दरवर्षी गावातील सर्व थोर अन्नदाते देणगीदार आणि मायबाप जाणता कायम आमच्या पाठीशी राहावी अशी विनंती एकच कार्य समाज कार्य यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते अमोल चौगुले यांनी केली.