इतर

नगर-पुणे रोडवरील  म्हसणे फाटा टोलनाका बंद करा-अविनाश पवार

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी

नगर-पुणे रोड वर अक्षरशः खड्डेच खड्डे पडले आहेत.१२ वर्षे या महामार्गावर टोलनाका चालु आहे पण तरीही रस्ता अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना कंपनी  करत नाही आहे.रस्त्याच्या दुतर्फा साइटच्या पट्यावर खड्डेच खड्डे पडलेले आहेत,रस्त्यावर १२ वर्षात प्रवाशांच्या आपत्कालीन मदतीसाठी  कंपनी ने साधा हेल्प लाइन नंबर सुद्धा चालू केलेला नाही, स्वच्छता गृह नाही, वळणावर, गावाच्या,शाळेच्या  ठिकाणी दिशादर्शक फलक लावने बंधनकारक असताना सुद्धा दुर्लक्ष करत आहेत.या गोष्टी संदर्भात विविध सामाजिक संघटनानी वेळोवेळी पञव्यवहार करुन सुद्धा गोष्टीचा गांभीर्याने विचार न केल्याने महामार्गावर अपघात होऊन अनेक निरपराध नागरिकांना  आपला जिव गमवावा लागला आहे .त्यामुळे या कंपनीला महामार्गावर टोलवसुली करण्याचा अधिकार नाही  असे पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व चेतक एंटर प्रायजेस अधिकारी वर्गासोबत पारनेर तहसीलदार तसेच  सुपा पोलिस निरीक्षक यांच्या सोबत बैठक होऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उप अभियंता वसंत तुकाराम पारधे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तसेच सुपा पोलिस स्टेशनला   लेखी  देऊन सुद्धा फक्त मलमपट्टी करण्यात आली व प्रत्यक्षात काम अपुर्ण असल्याने जो पर्यंत कामं पुर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाका बंद ठेवण्याची मागणी अविनाश पवार मनसे माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष  व सहकार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बिहारें कडे केली आहे

अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचे आदोंलन करणार असल्याचे पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button