अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संदर्भात होणारी ती बैठक अचानक स्थगित!

अकोले प्रतिनिधी:
– अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी बचाव कृती समितीच्या आंदोलना दरम्यान आंदोलकाच्या सर्व चौदा मागण्या सकारात्म्क भूमिका घेत संस्थेचे कार्यकारी विश्वस्त मधुकरराव पिचड यांनी मागण्या मान्य करून त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून माग्ण्यांच्या अनुशंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक उद्या बोलावली असताना देखील आंदोलकांकडून मात्र त्यापुर्वीच टिका टीपन्नी, व्यक्ती द्वेश आणि दुर्दैवाने पत्रकबाजी सुरु असून हि बाब संस्थेला बाधा आणणारी व तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक वातावरण खराब करणारी आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे हे कितपत योग्य आहे? आंदोलकांची भूमिका समाजात संभ्रम निर्माण करणारी असल्याने व अकोले तालुका एज्युकेशन संस्थेशी काही देणेघेने नाही त्यामुळे उद्या दि.९ मे २०२२ रोजी बचाव कृती समिती समवेत होणारी बैठक स्थगीत करण्यात आली असल्याची माहिती अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनिल दातीर यांनी दिली आहे
.
श्री.दातीर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, अकोले तालुका एज्युकेशन बचाव कृती समितीने अकोले महाविद्यालया समोर आंदोलन केले या दरम्यान संस्थेचे कार्यकारी विश्वस्त मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड आणि पदाधिकारी कार्यकारीणीवर अतिशय खालच्या पातळीला जाऊन टिका केली. नवनिर्वाचीत कार्यकारीणीवर आक्षेप नोंदवले. वास्तविक पाहता संस्थेच्या विश्व्स्ताना घटनेने जे अधिकार दिले त्याप्रमाणे विश्वस्त आणि कार्यकारीणी त्यांच्या अधिकारात तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते याना सामावून घेऊन सर्वसमावेशक करण्यात आली मात्र आंदोलकानी याचे राजकीय भांडवल करीत पिचड कुटुंब व कार्यकारीणीवर गैर व्यवहाराचे आरोप केले. वस्तविक या सर्व मागण्यासंदर्भात स्वत: पिचड साहेबांनी अंदोलकांशी थेट चर्चेचे निमंत्रण देत खुली चर्चा केली. अंदोलकांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य करीत पुढील सहा महिन्यात अंमलबजावणीचे लेखी आश्वासन दिले. त्याचा पहिला टप्पा म्हणून दि. 9 मे 2022 रोजी सोमवारी या मागण्यांच्या अनुषंगाने गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक बोलावली असताना देखील आंदोलकांनी तत्पुर्वीच पत्रकबाजी करीत व्यक्तीद्वेष आणि पिचड कुटुंबियांना जाणीवपुर्वक लक्ष केले. आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांपैकी संस्थेचे सभासदत्व खुले करण्याची भूमिका घेतली. वास्तविक पाहता अनेक कार्यकर्ते संस्थेचे सभासद नसतानाही तसेच त्यांचे संस्थेसाठी कोणतेही योग्दन नसताना संस्थेचे सभासद्त्व खुले करण्याची व आंदोलकांच्या विविध मागण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली. नोकरभरतीतील गैरव्यवहाराबाबदही चौकशी करण्याची तयारी दर्शविली, संस्थेचा वापर पिचड कुटुंबाच्या राजकारणासाठी आर्थिक लाभासाठी केला गेल्याचा आरोप केला जातो, हे आंदोलकांनी सिध्द करावे. आंदोलक एकीकडे बैठक घेऊन चर्चा करा म्हणतात आणि दुसरीकडे मात्र न्यायालयीन प्रक्रिया राबवतात हि आंदोलकांची दुटप्पी भूमिका कशासाठी?
संस्थेच्या माजी अध्यक्षांनी चांगले काम केले, त्यांना का हटविले? असा आंदोलकांचा आरोप असून येणार्याे काळात ते देखील पुराव्यानिशी स्पष्ट होईल. यापुर्वी संस्थेचे जे अध्यक्ष होऊन गेले त्यांच्या शिक्षणावर कधी चर्चा झाली नाही, त्यांनी आपले नातेवाईक कुटुंबातील लोक संस्थेत नोकरीला लावले यावर काही चर्चा झाली नाही. संपुर्ण संस्थेत पिचडांच्या कुटुंबातील एक व्यक्ती नव्हे तर पिचड नावाचा एकही व्यक्ती नोकरीला नाही तरी पिचडच टार्गेट का? आंदोलकांना नेमके यातून काय साध्य करावयाचे आहे? हे समजण्याइतकी अकोल्याची जनता खुळी नाही. पिचड साहेबांनी आंदोलकांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलक जी भूमिका घेत आहेत, त्याबद्दलच संशय असून याचे राजकीय भांडवल केले जाते हे दुर्दैवी आहे. आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीच्या विश्वस्त व काही कार्यकारिणी सदस्यांनी स्वत:हून राजीनामे दिले. या राजीनाम्यांची मागणी आम्ही केली नव्हती. वास्तविक पाहता विश्वस्त व पदाधिकारी कार्यकारिणी निवडताना तालुक्यातील सर्व पक्षांच्या तालुका अध्यक्षांच्या सहीने, पत्राने ह्या नावांची शिफारस संस्थेचे कार्यकारी विश्वस्त मधुकरराव पिचड यांना करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावांची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सिताराम पा.गायकर यांनी आ.डॉ.किरण लहामटे यांच्याशी चर्चा करुन केली असताना डॉ.लहामटे आंदोलनात कसे सहभागी झाले? की त्यांची भूमिका दुटप्पीपणाची नाही का? एकीकडे शिफारस करायची, दुसरीकडे हरकत घ्यायची, तिसरीकडे त्या विश्वस्त व कार्यकारिणी सदस्यांवर राजीनाम्यासाठी दबाव आणायचा ही डॉ.लहामटे यांची कृती तसेच बचाव समितीची भूमिका समाजात संभ्रमावस्था निर्माण करीत असून बचाव समितीला संस्थेच्या हिताचे काही घेणे देणे नाही. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या नावाखाली राजकारण करुन राजकीय पोळी भाजण्याचा हा त्यांचा डाव तालुक्यातील सुज्ञ जनता हाणून पाडील यात शंका नाही. या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे स्वार्थ आहेत. त्यांना संस्थेशी काही देणे घेणे नाही. तसेच आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करुन आ.डॉ.लहामटे यांना कायम विश्वस्त करु अशी निकोप भुमिका मधुकरराव पिचड यांनी घेतली. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांची एक सल्लागार समिती नियुक्त करण्याचीही भूमिका पिचड साहेबांनी घेतली. इतके सकारात्मक भूमिका घेत असतानाही आंदोलक मात्र जी आडमुठेपणाची भूमिका घेऊन फक्त बदनामी, व्यक्तीद्वेष एवढाच उद्देश आंदोलकांचा दिसत आहे असेही श्री.दातीर यांनी या पत्रकात शेवटी म्हटले आहे.या पत्रकावर संस्थेचे कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, वैभवराव पिचड, अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, खजिनदार धनंजय संत,आनंदराव नवले, सुधाकर आरोटे, शरद देशमुख, डॉ.डी.के सहाणे, रमेश जगताप, कल्पनाताई सुरपुरीया, यशवंत आभाळे यांच्या स्वाक्षरी आहेत.
————