महाराष्ट्र

राज्यस्तरीय विटी-दांडू स्पर्धेत अहमदनगर मुलींच्या संघाची पालघर संघावर मात

विटी -दांडू सारख्या पारंपारिक खेळाला नवसंजीवनी देण्याचे कौतुकास्पद–

आमदार डॉ किरण लहामटे

संजय महानोर

भंडारदरा प्रतिनिधी

       महाराष्ट्र राज्य विटी -दांडू संघटना व अहमदनगर विटी -दांडू संघटना यांच्या संयुक्त विदयमाने खुल्या राज्यस्तरीय विटी -दांडू स्पर्धा (वाकी ता अकोले) येथे मोठया उत्साहात पार पडल्या .
 या स्पर्धैसाठी महाराष्ट्रातुन संघ दाखल झाले होते .अतिम सामन्यात मुलींच्या अहमदनगर संघाने पालघर संघावर दिमाखात मात करत विजेतेपद पटकाविले .          पारंपारिक विटी -दांडू खेळाला नवचेतना देण्यासाठी अहमदनगर विटी -दांडू संघटनेकडून सलग दुसरे वर्ष यशस्वी राज्यस्तरीय स्पर्धा अकोले तालुक्यातील वाकी येथे उत्साही वातावरणात पार पडल्या .  स्पर्धैसाठी अहमदनगर विटी दांडु संघटनेचे जिल्हाध्यक्ष मेजर विठ्ठल बांगर व जिल्हा  उपाध्यक्ष अर्जुन तळपाडे यांनी सह्याद्रीच्या कुशीत आदिवासी खेळाडुंच्या कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश ठेऊन वाकी येथे स्पर्धेचे आयोजन केले होते  या स्पर्धेमध्ये मुले व मूली संघामध्ये अहमदनगर , वाकी , पालघर , जालना , पांजरे , गुहिरे , मुंबई , शेंडी या संघानी सहभाग घेतला . विद्यमान आमदार डॉ . किरण लहामटे व बाजीराव सगभोर   या मान्यवरांच्या  हस्ते स्पर्धेचे उद्घाघाटन करण्यात आले .विटी -दांडू सारख्या पारंपारिक खेळाला नवसंजीवनी देण्याचे कौतुकास्पद काम अहमदनगर विटी -दांडू संघटना करत आहे , याचे खरोखर कौतुक वाटते असे गौरोद्गार आमदारांनी काढले .     

     या स्पर्धेत मुलींचा संघ  अहमदनगर अंतिम विजेता, पालघर उपविजेता तर तृतीय क्रमांक शेंडी संघाने पटकावला . मुलांचा पालघर संघ अंतिम विजेता , अहमदनगर उपविजेता तर वाकी संघाने तृतीय क्रमांक मिळवला . या स्पर्धेसाठी जालना येथील आंतरराष्ट्रीय पंच अतुल आव्हाड यांनी काम पाहिले .स्पर्धेसाठी श्री .नामदेव सोनवणे शिर्डी पोलीस यांनी चषक सौजन्य दिले .पारितोषिक वितरण   संतोष बोटे  ,  धिरज सगभोर , गुणाजी झोले , सुषमा सगभोर , माधुरी आवारी . राम सगभोर , चंद्रकांत सगभोर ,. हरी जाधव ,  सोमनाथ सगभोर , भाऊराव सगभोर या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी दिलीप बांबळे , संदिप घाणे , दत्ता सोनवणे , तानाजी आसवले , देविदास सोनवणे , संदिप सगभोर , नामदेव सोनवणे , गौतम सोनवणे , भगवान जाधव , अमोल सोनवणे , केशव घोडे ,रोहिणी लोटे , फसाबाई बांडे , स्नेहल बनसोडे , सुनिता पटेकर , वैष्णवी सगभोर यांनी काम पाहिले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button