इतर
निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन सुटले!

अकोले प्रतिनिधी
निळवंडे धरणातून लाभक्षेत्रातील शेतीसाठी असणारे दुसरे उन्हाळी आवर्तन आज मंगळवारी
( दि १०) सकाळी सहा वाजता सुरू करण्यात आले
१४०० क्यूसेस वेगाने नदीपात्रात हे आवर्तन सुरू करण्यात आले असून २० ते २५ दिवस आवर्तन सुरू राहील या आवर्तनात तीन ते साडेतीन टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे
११ टी एम सी साठवण क्षमतेच्या भंडारदरा धरणात सध्या ४९७८ दल घ फु पाणी साठा आहे तर ८ टीएमसी निळवंडे धरणात आवर्तन सोडते वेळी ४३१६ दलघफु पाणी साठा शिल्लक होता या आवर्तनात ३००० ते ३५०० दलघफु पाण्याचा वापर होणार आहे शेती साठी चे हे दुसरे उन्हाळी उन्हाळी आवर्तन आहे असे जलसंपदाच्या सूत्रांनी सांगितले