इतर

गाव बोलावतो’ हा चित्रपट ७ मार्च ला प्रदर्शित होतोय. चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण

मुंबई प्रतिनिधी दि २१ – सध्या गावाकडची बरीचशी तरूणाई ही शहराकडे येऊन शिक्षण घेताना, नोकरी करताना दिसते. यामुळे अनेक गावांमध्ये फक्त वयस्कर लोकच दिसतात, आणि त्यामुळे गावांकडे आजही सगळ्याच प्रकारच्या प्रगतीचा अभाव दिसतो. एकीकडे शहरं वाढतचं चालली आहेत, तर दुसरीकडे गावं ओसाड पडताना दिसू लागली आहेत. याच गंभीर विषयावर भाष्य करणारा ‘गाव बोलावतो’ हा चित्रपट ७ मार्च रोजी प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे आज (ता. २१) अनावरण करण्यात आले.

गावातील एखादा मुलगा शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने शहराकडे गेला की तो तिकडचाच होतो. त्याचे कुटुंब, आई-वडिल त्या अप्रगत गावात दिवस ढकलताना दिसतात. मुलाने गावाकडे यावं, शेतीकडे लक्ष द्यावं असं प्रत्येक आई-वडिलांना वाटतं पण इतर गोष्टींना प्राधान्य देणारी तरूण पिढी शहराच्या झगमगाटात हरवून जाते आणि गावाचं मन जाणू शकत नाही. भूषण प्रधान, माधव अभ्यंकर, गौरी नलावडे, श्रीकांत यादव, किरण शरद यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘गाव बोलावतो’ चित्रपटात ग्रामीण प्रश्नांवर आणि समस्यांवर भाष्य करण्यात आलंय त्यामुळे सर्वांनाच या चित्रपटाची प्रतिक्षा आहे.

संस्कार वाहिनी प्रोडक्शन आणि फिल्मिटेरियन मीडिया वर्क्स निर्मित ‘गाव बोलावतो’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद माणिकराव हे आहेत. तर निर्माते प्रशांत मधुकर नरोडे, शंतनू श्रीकांत भाके हे आहेत, तर व्हिज्युअल बर्ड्स इन्स्टिट्यूट अँड स्टुडिओ, अमित मालवीय, प्रवीण इंदू, गणेश इंगोले, सुधीर इंगळे, तुषार खेरडे, दिनेश राउत हे सहनिर्माते आहेत. ७ मार्चपासून हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.

Instagram

https://www.instagram.com/reel/DFE7TJkCw-l/?igsh=MTE1ampjOHlhMnB3dw==

Facebook

https://www.facebook.com/share/v/1E15q3EqHy

YouTube

Motion Poster Download Link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button