जिल्हा परिषदेत न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून ग्रामपंचायतींना कामे वाटप करा

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
जिल्हा परिषदेमध्ये काम वाटप करताना न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून काम वाटप करावे अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज महाराष्ट्र राज्य महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले
महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना द्वारे मुंबई हायकोर्टात पीटिशन दाखल केली होती सदर पिटीशन मध्ये १५ लक्षाच्या आतील कामे जिल्हा परिषद बेकादेशीर पणे ग्रामपंचायत ला एजन्सी म्हणून कामे देतात ते रद्द करावेत अशी पीटिशन दाखल केली होती दिनांक ०२-मे-२०२२ रोजी. कोर्ट निर्णय पिटीशन नं. २४५८ ऑफ २०२२ कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्या आदेशाची कार्यवाही करावी असे म्हटले आहे
आता तरी बेकादेशीर पणे ग्रामपंचायतीना कामे देऊ नये न्यायालयाच्या आदेशाचा अंमलबजावणी करावी तसेच या पूर्वी ग्रामपंचायतींना बेकायदेशीर कामे देऊन ठेकेदार संपवण्या मागे असणाऱ्या अधिका-यांवर चौकशी
करून कारवाई करावी व यापुढे ३३:३३:३४ मधे कामे वाटप करावीत १० लाखाच्या आतील कामे काम वाटपात घेऊनच कामे वाटप करावीत व १० लक्ष वरील कामे ई टेंडर प्रणाली वापरात यावी व ठेकेदार यांच्याशी न्याय करावा अशी मागणी

महाराष्ट्र रजत राज्य कंत्राटदार महासंघाचे
जिल्हा अध्यक्ष समीर शेख संघटक वैष्णव मिसाळ खजिनदार अक्षय कराड यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे सोबत मा उच्च न्यायालय मुंबई हायकोर्ट च्या रिट पिटीशन कोर्ट निर्णय पिटीशन नं. २४५८ ऑफ २०२२ दि.०२-मे-२०२२ च्या आदेशाची प्रत जोडली आहे