सामाजिक
मुंबई हिंदी सभा अमृत महोत्सव संपन्न

महादर्पण वृत्तसेवा
मुंबई हिंदी सभा अमृत महोत्सव वर्षानिमित्त शिवाजी मंदिर दादर येथे आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा मुंबई हिंदी सभेचे कुलपती छगन भुजबळ व शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
यावेळी अखिल भारतीय हिंदी संस्थेचे जनरल सेक्रेटरी राजेंद्र खिमानी, श्री.राकेश शर्मा, माजी न्यायाधीश डॉ.संतोषकुमार जयस्वाल, मुंबई हिंदी सभेचे प्रधान सचिव सूर्यकांत नागवेकर,उपकुलपती विजय परदेशी,कोषाध्यक्ष देवदत्त साळवी, सांस्कृतिक सचिव शाह आलम मिर्झा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
