अकोल्यात रविवारी प्रवरा परिक्रमा ग्रंथ व अगस्त्य कादंबरीचे रविवारी प्रकाशन!
अकोले प्रतिनिधी-
मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा,जेष्ठ कवयित्री डॉ अरुणा ढेरे यांच्या हस्ते रविवारी येथील अगस्ती आश्रमात प्रवरा परिक्रमा या ग्रंथाचे तसेच डॉ अनिल सहस्त्रबुद्धे लिखित अगस्त्य कादनबरीच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन करण्यात येणार आहे,.
आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट, अ.नगर आणि श्री अगस्ती ऋषी देवस्थान ट्रस्ट अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प परिपूर्ती तथा ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहेआनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्षप्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून, श्री अगस्ती ऋषी देवस्थान ट्रस्ट अकोले यांच्यासहकार्याने आणि प.पू. स्वामी गोविंददेवगिरिजी महाराज,प.पू. द्वाराचार्य विद्यावाचस्पती महामंडलेश्वर रामकृष्णदास लहवितकर महाराज आणिप.पू. भास्करगिरी गुरू किसनगिरीबाबा महाराजयांच्या शुभाशीर्वादाने व प्रेरणेने पूर्णत्वास गेलेल्याप्रवरा परिक्रमा प्रकल्पाच्या ‘प्रवरा परिक्रमा’ या ग्रंथाचातसेच प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे लिखित ‘अगस्त्य’ कादंबरीचे श्रीमान विनायक पवळे यांनी राष्ट्रभाषा हिंदीमध्ये अनुवादित केलेल्या ‘अगस्त्य’ उपन्यास ग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे.
हे दोन्ही ग्रंथ ‘मोरया प्रकाशन पुणे/डोंबिवली या ख्यातकीर्त प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहेत.श्री कूर्मजयंती आणि श्री भगवान महर्षी अगस्तीमुनी लोप या पावनपर्वात रविवार दि. १५ मे २०२२ रोजी सकाळी १०.४५ वा. अकोले येथील महर्षी अगस्तीमुनी आश्रमात, प्रकल्पातील सहयोगी मान्यवर रसिक आणि प्रवरामाता व भगवान महर्षी अगस्तीमुनी भक्तांच्या सन्मान्य उपस्थितीत होणारा हा प्रकल्प परिपूर्ती तथा ग्रंथप्रकाशन सोहळाडॉ. अरुणा ढेरे(महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विदुषी तथा लोकसंस्कृती व लोकसाहित्याच्या अभ्यासक,कवयित्री, ज्येष्ठ लेखिका व भूतपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ) यांच्या शुभ हस्ते .आणि अॅड. के. डी. धुमाळ (प्रवरा परिक्रमा प्रकल्प संघटक, अध्यक्ष श्री अगस्त्य ऋषी देवस्थान ट्रस्ट अकोले)यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे
. या सोहळ्यासाठी सुरेशराव कोते (ज्येष्ठ उद्योजकता पथदर्शी तथा लिज्जत पापड चे मुख्य व्यवस्थापक व सामाजिक कार्यकर्ते), . डॉ. गजानन डांगे (सदस्य- ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार, आदिवासी, कृषी आणि पर्यावरण क्षेत्रात तज्ज्ञ मार्गदर्शक), विनायक पवळे (अखिल भारतीय साहित्य परिषद प. महाराष्ट्र चे उपाध्यक्ष तथा ‘अगस्त्य’ कादंबरीचे हिंदी अनुवादक), श्री. दिलीप महाजन (प्रकाशक : ‘मोरया प्रकाशन’ आणि ज्येष्ठ समर्पित सामाजिक व राष्ट्रीय कार्यकर्ते),या मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न होत आहे.
या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा.असे आवाहनआनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट, अ.नगर वश्री अगस्त्य ऋषी देवस्थान ट्रस्ट अकोले, अ.नगर आणि प्रकल्प सहयोगी मान्यवर कपिल सहस्रबुद्धे, हेरंब कुलकर्णी, महादेव कुलकर्णी, भूषण देशमुख,प्राचार्य प्रकाश टाकळकर, योगेश कर्डिले, विजय सांबरे, रामनाथ आरोटे, विठ्ठल खाडे, अरविंद भांगरे, बाळासाहेब गाडे, दिलीप क्षीरसागर, प्रा. डॉ. मच्छिंद्र मालुंजकर, आर. के. मुतडक, ह.भ.प. राजेंद्र महाराज नवले, मच्छिंद्र भरीतकर, सतीश मालवणकर, अनिल सोमणी, धनंजय संत, श्रीपाद कुलकर्णी, मोरेश्वर धर्माधिकारी यांनी केले आहे
.—– ———