इतर

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या पत्नी सुनीताताई भांगरे यांना जिवे मारण्याची धमकी !

अकोले प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या पत्नी राजूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुनीताताई भांगरे यांना जिवे मारण्याची धमकी दुरध्वनीवरून देण्यात आली.

सुनीता भांगरे यांनी याबाबत राजूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी
डोंबिवलीतील रामेश्वर गजानन शातलवार याच्या विरोधात निनावी संदेशाद्वारे धमकाविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनीता भांगरे यांनी मुतखेल ता अकोले येथील शासकीय आश्रमशाळेला भेट दिली होती

एकात्मिक आदिवासी प्रकल्प राजूर प्रकल्प
अंतर्गत सुरू असलेल्या आश्रमशाळा मधील सुविधांचा अभाव तसेच येथील कारभाराबाबतच्या त्रुटी बाबत आवाज उठविला व सुनीता भांगरे यांनी आश्रमशाळांना भेटी देऊन तेथील कारभाराचा पंचनामा केला. त्याचा राग मनात धरून शुक्रवारी सकाळी११.४० वा मूतखेल आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांचा भाऊ बोलतोय असे सांगून फोन करणाऱ्या इसमाने सुनीता भांगरे यांना
फोन करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.आमच्या वाट्याला जाऊ नका असे सांगून खुनाची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारूती मेंगाळ यांनी या संदर्भात प्रसिद्धी पत्रक काढले. या त्यांनी म्हटले आहे की,सुनीता भांगरे गेली अनेक वर्षांपासून अकोले तालुक्यात
जिल्हा परिषदेच्या मध्यमातून नेतृत्व करत आहेत. मागील अनेक वर्ष प्रकल्प कार्यालय समितीच्या अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सक्षमपणे पार पडली आहे. काही दिवसांपूर्वी
अकोले तालुक्यातील मुतखेल आश्रम शाळेतील
विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत आवाज उठवला होता.काही प्रश्न त्यांनी उघडकीस आणले होते. प्रशासनावरअंकुश ठेवणे हे लोक प्रतिनिधींचे काम आहे. प्रशासनामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या निदर्शनात आणून त्या प्रश्नांची सोडवणूक करणे हे लोक प्रतिनिधींचे
काम आहे हे काम करत असताना जर कोणी चुकीच्या पद्धतीने एखाद्या जिल्हा परिषद सदस्यांना धमकावत असेल तर आम्ही सहन करणार नाही. त्यालाजशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही देखील मैदानात येऊ
असा इशारा मारुती मेंगाळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे
अकोल्यातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसने ही या घटनेचा निषेध करून धमकी देणाऱ्या इसमाला।तात्काळ अटक करावी अशी मागणी केली असून अकोले पोलिसांना तसे निवेदन दिले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button