इतरमहाराष्ट्र
हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी पक्का रस्ता करा -भाऊसाहेब देशमुख

अकोले प्रतिनिधी
हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी पक्का रस्ता करावा अशी मागणी कोतुळ येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब भगवंता देशमुख यांनी केली आहे
मुळा नदीचे उगमस्थान असणारे हरिश्चंद्र गड हे प्राचीन आणि महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे या पर्यटन स्थळाला ऐतिहासिक वारसा आहे यामुळे राज्यभरातून अनेक पर्यटक या ठिकाणी हरिश्चंद्रगडावर भेट देतात येथील निसर्ग सौंदर्य याला पर्यटक भारावून जातो मात्र रस्त्या अभावी अनेक पर्यटकांना हरिश्चंद्रगडावर भटकंती करण्यासाठी अडचण निर्माण होते रस्ता व लाईट यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास गडावर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास श्री देशमुख यांनी व्यक्त केला आहे