जागतिक परिचारिका दिन साजरा करत नासिक रोटरी ने केला परिचारिकांचा सत्कार !

नाशिक प्रतिनिधी
१२ मे हा जगविख्यात परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो.
याच दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ नासिक तर्फे नाशिक मधील शासकीय रुग्णालयात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या परिचारिकांचा प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. या सर्व परिचारिका बालरुग्ण अतिदक्षता विभागात काम करीत असून त्यांनी अनेक बालरुग्णांची शुश्रूषा करून त्यांना बरे करण्यात तेथील डॉक्टर्स ना मोठी मदतच केली आहे ,त्यांच्या या कार्यास रोटरी ने यथोचित सन्मान करीत जागतिक परिचारिका दिन साजरा केला
.या कार्यक्रमास सिव्हील सर्जन डॉ. थोरात,बालरोग विभाग प्रमुख डॉ. पंकज गाजरे , डॉ.दिनेश ठाकूर , रोटे. डॉ.अस्मिता मोरे तसेच अनेक परिचारिका उपस्थित होत्या.राधिका गेंद ,छाया शिंदे, श्रद्धा पाटील ,सीमा गवई, मीना नागमोडे,रोहिणी पाटील,सीमा शेवाळे,माधुरी बनसोडे,भारती दळवीं,पल्लवी हुंगर्गे,कल्पना बच्छाव,वर्षा शिंदे,स्वाती गंगावणे, अलका नागरगोजे या परिचारिकांचा सत्कार करण्यात आला.रोटरी क्लब ऑफ नासिक च्या अध्यक्षा डॉ.श्रीया कुलकर्णी यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.