
अकोले प्रतिनिधी
तमाशा कलाकार तरुणीच्या गालाचा घेतला चावा!
एका तमाशा कलाकारांने आपल्या सहकारी तमाशा कलाकार तरुणी शी लगट करण्याच्या प्रयत्नात तरुणीच्या गालाचा चावा घेतला आज पहाटे ही घटना घडली
या प्रकाराने तमाशा कलाकारां मध्ये खळबळ उडाली याबाबत हाती आलेली माहिती अशी की अकोले तालुक्यातील केळी कोतूळ येथील बांगरवाडी येथे यात्रेनिमित्त लोकनाट्य तमाशा चा कार्यक्रम रात्री झाला कार्यक्रम झाल्यानंतर पहाटे या दोन कलाकारांमध्ये लगट झाली
या चावट चाळ्यातून तमाशातील या तरुणी शी लगट करण्यास विरोध केल्यामुळे तिच्या गालाचा या कलाकारांने चावा घेतल्याची माहिती हाती आली आहे हे प्रकरण चांगलेच चर्चिली जात असताना तरुणीच्या तक्रारीवरुन पोलीस या ठिकाणी सकाळी पोचले व जबाब नोंदवत असताना वरिष्ठ पातळी वरुन फोनाफोनी झाल्यानंतर या प्रकरणातील हवा गेली या तरुणीने माझी काही तक्रार नसल्याचे लिहून दिल्याने या प्रकरणावर पडदा पडला
या दोघांचे एकमेकांचे प्रेम संबंध असल्याचे बोलले जाते यातून हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे हा प्रकार ज्या वेळी झाला त्यावेळी दोघेही नशेत असल्याचे बोलले जाते लगट करण्यास विरोध केल्यामुळे प्रेमवीराने या तरुणीच्या गालाचा चावा घेतला माझी काही तक्रार नाही असे तरुणीच्या जबाबामुळे या
पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले मात्र परिसरात या घटनेची खमंग चर्चा आज दिवसभर सुरू होती