मुळा’च्या स्वीकृत तज्ञ संचालक पदी श्रीमती कमल दहिफळे यांची निवड.!

‘
सोनई प्रतिनिधी
मुळा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक नामदार शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या कारखाना संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये संचालक मंडळावर स्वीकृत तज्ञ संचालक म्हणून गणेशवाडी येथील श्रीमती कमलबाई चांगदेव दहिफळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
गणेशवाडी येथील दिवंगत कार्यकर्ते चांगदेव आनंदाभाऊ दहिफळे यांच्या त्या पत्नी आहेत. निवडीनंतर श्रीमती दहिफळे यांचा नामदार शंकरराव गडाख पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मिटिंगसाठी कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडूबाळ पाटील कर्डिले, ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब पा. मोटे, बापुसाहेब शेटे, बाबुराव चौधरी, लक्ष्मण पांढरे, महिला प्रतिनिधी अलकाताई रंगनाथ जंगले, ताराबाई सुखदेव पंडीत आदीसह सर्व संचालक तसेच कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर व इतर अधिकारी, महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटनेचे सरचिटणीस नितीनराव पवार तसेच सोनई, वंजारवाडी व गणेशवाडी येथील कार्यकर्ते सर्वश्री सुभाष राख, अंबादास दराडे, काशिनाथ दराडे, महादेव गडाख, आदिनाथ सत्यवान दहिफळे, महादेव तांदळे, कैलास दरंदले, आसाराम पालवे, रावसाहेब दहिफळे आदी उपस्थित होते. यावेळी गणेशवाडी ग्रामस्थांनी गावाला संचालक पदाची संधी दिल्याबद्दल नामदार गडाख पाटील यांचा शाल व बुके देऊन सन्मान केला. निवडीनंतर श्रीमती दहिफळे यांनी कार्यकर्त्यांसह कारखान्याचे संस्थापक, संचालक जेष्ट नेते यशवंतराव गडाख पाटील यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.माझे पती कै. चांगदेव दहिफळे हे गडाख साहेबांच्या संघटनेशी व परिवाराशी कायम एकनिष्ठ राहिले. त्याचीच पावती म्हणून संचालक मंडळ या पदासाठी माझे नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगून दुर्दैवाने माझे पती आज हयात नाहीत. ते असते तर मात्र संचालक म्हणून झालेल्या निवडीचा सर्वाधिक आनंद त्यांना झाला असता असे भावूक मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
—श्रीमती कमलबाई दहिफळे,स्वीकृत संचालक.