शेलद येथील जलजीवन ची पाणी योजनेचे काम निकृष्ट!

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील शेलद गावाला पाणीपुरवठा करन्यायासाठी बांधण्यात येणारी जल जीवन योजना चे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे
सुमारे तीन कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या शेलद गावच्या पाणी योजने कडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे कंत्राटदार मन्मनिंप्रमाणे या योजनेसाठी निकृष्ट साहित्य वापरत आहे ग्रामस्थांनी आज या ठिकाणी जाऊन कामाची पाहणी केली व कंत्राट दाराची कान उघडनी केली वापरण्यात येणारे साहित्य व वाळू माती मिश्रित असल्याने ही वाळू वापरल्यास योजनेचे आयुष्यमान कमी होऊन योजना कुचकामी ठरेल असा प्रश्न उपस्थित केला हे निकृष्ट साहित्य वापरणे तातडीने थांबवावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली
याबाबत ग्रामस्थ लवकरच वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले सुमारे तीन कोटी रुपये या योजनेसाठी खर्च केले जात आहे कामाचा दर्जा दर्जाबाबत ग्रामस्थांनी तक्रार केली आहे केंद्र सरकारच्या या जलजीवन मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेला शेलद गावामध्ये सुरुंग लावून निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे ग्रामस्थ नितीन यादव, मच्छिंद्र यादव
भास्कर तळेकर , प्रकाश यादव, संजय तळेकर,
गोपीनाथ यादव, संदीप यादव यांनी वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे