खडकवाडी येथे सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते विकास कामांचे भुमिपुजन !

पारनेर प्रतीनिधी
पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे केंद्र सरकारच्या जलजीवन योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजना तसेच जलशुध्दीकरण प्रकल्प चे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात करण्यात आले
. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून तसेच सुजित झावरे पाटील यांच्या प्रयत्नातून
केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजने अंतर्गत मंजुर करण्यात आलेल्या खडकवाडी येथील जांभुळवाडी येथे स्वतंत्र पाणी योजनेचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे
वेळी बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले खडकवाडी गावावर स्व. दादांचे नितांत प्रेम होते वासुंदे खडकवाडी वडगाव सावताळ या तीन्ही गावांनी एका कुटुंबासारखे कायमचं आम्हाला प्रेम दिले आहे मला आजही जुना काळ आठवतो या गावात कोणत्या ना कोणत्या माध्यमातून दादां सोबत येण्याचा योग आला खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून तसेच सुजित झावरे पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या जांबुळवाडी वस्ती वरील स्वतंत्र नवीन पाणी योजनेसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात आले आहे तसेच पंचायत समिती सदस्य सुप्रिया साळवे यांच्या प्रयत्नातून गावाला जल शुद्धीकरण प्रकल्प बसविण्यात आला आहे. यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले की, खडकवाडी गावावर स्व.दादाचे नितांत अस प्रेम आहे. वासुंदे, खडकवाडी, वडगाव सावताळ हे तिन्ही गावांनी एक कुटुंब असल्या सारखं प्रेम आम्हाला कायम दिलं आहे. मला आज ही जुना काळ आठवतो. या गावात कोणत्या ना कोणत्या विकास कामांच्या माध्यमातून दादा सोबत आलो आहे. दादांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच आमदारकीचा काळात या गावाला कायम झुकते माप दिले आहे.
या गावात त्या काळातील १ कोटीचा प्राथमिक आरोग्य केंद्र, पशू वैद्यकीय दवाखाना, गावातील वेस, रस्ते, बंधारे, पाझर तलाव, सभामंडप काँक्रिट रस्ता असे अनेक कामे या गावात स्व. दादांनी तसेच मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केली. आज ही एवढ्या मोठ्या तालुक्यातील प्रत्येक गावात संच टिकण्याचं कारण म्हणजे मला स्वत: काही मिळेल या उद्देशाने कधी ही केले नाही. पारनेर तालुक्याने आम्हाला खूप दिलं आहे.दादांना १३ वर्ष पंचायत समिती सभापती, १० वर्ष आमदारकी मला पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसेच आईला जिल्हा परिषद सदस्य या तालुक्याच्या प्रेमातून आम्ही कधी उतराई होऊ शकत नाही. या तालुक्याचा प्रेमापोटी जो पर्यंत आहे. विकासकामे आणून तालुक्याचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणार. आज ही माझ्याकडे कोणतीही सत्ता नाही परंतु परमेश्वराची इच्छा शक्ती आणि तालुक्यातील लोकाचे प्रेम यामुळे मला विकासकामे करण्याचं कोणतीही अडचण येत नाही परमेश्वर माझ्या हातातून हे सगळ करून घेतो. कोणत्याही गोष्टीची कमी परमेश्वर मला पडू देत नाही.
आज तालुका वैचारिक राहिला नाही विकासकामावर कोणीही बोलत नाही आपसी हेवेदावे, वैयक्तिक द्वेष, या कारणांमुळे गावातील विकास खुंटला आहे. गावातील एकजूट यामुळे कमी होत आहे हे तालुक्यातील दुर्दैव आहे. आपण सर्वांनी यापुढे गावाच्या विकासासाठी एकत्र या. जो गावाच्या विकासासाठी प्रयत्न करेल त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे रहा.
यावेळी पंचायत समिती सदस्य अमोल साळवे, किसन धुमाळ, मा. पंचायत समिती सदस्य इंदुमती मेंगाळ, मा. सरपंच मिठूशेठ जाधव, स्वप्नील राहींज, चेअरमन विश्वनाथ ढोकळे, सरपंच शोभा शिंदे, विष्णूशेठ शिंदे, दावजीराम वाबळे, विठ्ठल शिंदे, भाऊसाहेब गागरे, कैलास आग्रे, बाबासाहेब आग्रे, ग्रा.सदस्य अर्चना गागरे, सोमनाथ गागरे, प्रवीण भन्साळी, शिवाजी गागरे, राजेंद्र आहेर, धनंजय चौधरी, प्रकाश शेठ शेवंते, संजय कर्णावट, शिवाजी शिंगोटे, नवनाथ विचारे, सचिन ढोकळे, प्रसाद झावरे, संतोष शिंदे, सिताराम गागरे, गणेश गागरे, संतोष ढोकळे, भिमराज ढोकळे, पोपटराव गागरे, खंडू ढोकळे, अण्णासाहेब ढोकळे, सुरेश गागरे, प्रभाकर झावरे, शरद गागरे, बाबासाहेब रोकडे मेजर, सुभाष गागरे, विठ्ठल नवले, राजेंद्र ढोकळे, प्रभाकर घेमोढ, बाबासाहेब वी नवले, योगेश खणकर, महादू गागरे, यशवंत हुलावळे, धोंडीभाऊ शिंगोटे, मयूर रोकडे, मा.चेअरमन आत्माराम गागरे, वैभव चौधरी, मुरली शिंदे, संपत हुलावळे, संदीप ढोकळे, राजू ईघे, गणेश कुटे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.