सुरक्षा रक्षकांच्या वाढीसाठी कामगार मंत्री यांच्या घरावर मोर्चा चा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा इशारा !

पुणे दि १४
महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाने सुरक्षा रक्षकांची प्रलंबित वेतनवाढ व इतर मागण्या विषयी दिनांक १३/०३/२०२३ रोजी अप्पर कामगार आयुक्त कार्यालय, शिवाजी नगर पुणे येथे धरणे आंदोलन केले . सुरक्षा रक्षक हे समाजात, औद्योगिक क्षेत्रात, शासकीय, निमशासकीय इमारती, बॅंक, सेवा क्षेत्र , आ टी कंपनी, नगर पालिका, महानगरपालिका, शाळा, काॅलेज, माॅल, ई क्षेत्रात चोवीस तास, तिनशे पासष्ट दिवस कार्यरत राहुन मालमत्तांच्या , नावलौकिक चे रक्षणासाठी सज्ज असतात. या कामगारांना सध्या सुरक्षा रक्षक महामंडळ मार्फत 11 हजार रूपये ते 12 हजार रुपये वेतन मिळते आहे. या मिळालेल्या वेतना मध्ये किमान गरजाही पुर्ण करणे जिकिरीचे झाले आहे. या कामगारांना महागाई च्या प्रमाणात वेतन वाढ त्वरित मिळाली पाहिजे या बाबतीत संघटनेने राज्य सरकार, मंडळ कडे मागणी पत्र दिलं आहे . वारं वारं पाठपुरावा केला आहे. लक्षवेधी आंदोलन ही केली आहे. पण शासन या बाबतीत चर्चा, निर्णय करायला ही तयार नाही . शासनाने, प्रशासनाने डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या आहे ही पट्टी काढुन त्वरित मागील फरका सहित वेतन वाढ करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ कामगार मंत्री, यांच्या घरा समोर तीव्र निदर्शने करण्याचा ईशारा संघटनेचे सरचिटणीस अॅड विशाल मोहिते यांनी कामगार ऊपायुक्त कार्यालय शिवाजी नगर पुणे येथे झालेल्या आंदोलन च्या वेळी दिला .
या आंदोलनात प्रमुख मागणी
१) २० टक्के दराने फरकासह वेतनवाढ देण्यात यावी
२) राष्ट्रीय सुट्ट्यांचे वेतन दुप्पट दराने देण्यात यावे.
३) नैमित्तिक रजा,अर्जित रजा या लागु करून यांचे वेतन घरभाडे भत्तासह देण्यात यावे.
४) बेरोजगार सुरक्षा रक्षकांना किमान वेतन घरभाडे भत्तासह देण्यात यावे.
या मागण्या शिष्ट मंडळाने कामगार उपायुक्त तथा अध्यक्ष श्री.अभय गिते यांच्या कडे कायदेशीर दृष्ट्या व समर्थनीय अभ्यासपूर्ण मांडल्या आहेत. श्री अभय गीते यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच यावर कार्यवाही सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले. लवकरात लवकर मागण्या मंजूर झाल्या नाहीतर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील महासंघाने दिला आहे.
सदर आंदोलनात भारतीय मजदुर संघाचे केंद्रीय पदाधिकारी श्री.अण्णा धुमाळ,प्रदेश संघटनमंत्री श्री. श्रीपाद कुटासकर, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे महामंत्री सचिन मेंगाळे,जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण,सचिव बाळासाहेब भुजबळ,महासंघाचे महामंत्री . ॲड.विशाल मोहिते,कार्याध्यक्ष अनिल पारधी,संघटनमंत्री अविनाश मुंढे,उपाध्यक्ष शंभु खंडाळे व महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री.युवराज नाळे, उपाध्यक्ष सुनील गायकवाड , मिना अढारी व प्रदेश मीडिया प्रमुख सागर रूपटक्के , तुकाराम कुंभार व मोठ्या संख्येने सुरक्षा रक्षक उपस्थित होते.