अहमदनगर

शिवभिषेक सोहळा घराघरापर्यंत पोहचणार -चंद्रकांत लबडे महाराज


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी

शेवगाव येथे 150 वा शिवभिषेक सोहळा तहसीलदार संतोष काकडे यांच्या हस्ते नुकताच पार पडला

या शिवभिषेक सोहळ्यानिमित्त शिवरायांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम करत आहे. शुक्रवारी शिव अभिषेक साजरा व्हावा हि संकल्पना लबडे महाराजांनी शेवगाव येथे महाराष्ट्रात प्रथमच साकारली असे म्हणत तहसीलदार काकडे साहेबांनी मराठा भुषण चंद्रकांत महाराज लबडे यांचे अभिनंदन केले.


शेवगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे गेल्या 4 वर्षांपासून दर शुक्रवारी अखंड पणे लबडे महाराज व त्यांचे सहकारी शिव अभिषेक सोहळा आयोजित करत आहेत. असाच शिव अभिषेक सोहळा लबडे महाराजांच्या पुढाकारातून चालु झालेले आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यात प्रत्येक स्मारकाच्या ठिकाणी अभिषेक सुरू व्हावेत यासाठी लबडे महाराज लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
लबडे महाराज पुढे म्हणाले की,तरूणांनी शिवरायांचे विचार आत्मसात करावे.यावेळी शिवअभिषेक समिती च्या वतीने तहसीलदार साहेबांचा सत्कार समिती चे अध्यक्ष लबडे महाराज यांनी केला.
या शिवभिषेकास स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषिराज टकले, विनोद ठाणगे, डॉ निरज लांडे, अमोल घोलप, पत्रकार रामनाथ रुईकर,भापकर सरपंच, सखाराम ढोरकुले,अक्षय खोमणे, शिवाजी भोसले, सुनील गवळी, डॉ योगेश फुंदे ,हरीश शिंदे, भारत दहिवाळकर,राम नेव्हल आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button