इतर

रोटरी क्लब ऑफ नासिक तर्फे यंग अचिव्हर्स अवॉर्ड्स प्रदान

नाशिक प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ नासिक हि एक आंतराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली सामाजिक संस्था असून नासिक मधील रोटरी क्लब हा ७६ वर्षाची परंपरा असलेला क्लब आहे आणि अनेक समाजोपयोगी कार्यक्रमाद्वारे हि संस्था आपली सामाजिक बंधिलकी जपत आलेली आहे. नाशिक मधील विविध क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणाऱ्या युवक युवतींचा सत्कार दरवर्षी करण्यात येतो , यंदा हा सत्कार सोहळा रोटरी क्लब ऑफ नासिक च्या गंजमाळ येथील हॉल मध्ये अतिशय उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी त्रिंबकेश्वर देवस्थान चे तज्ज्ञ सल्लागार , काळाराम मंदिराचे विश्वस्त व बिझिनेस सीक्रेटस या पुस्तकाचे लेखक श्री मिलिंद तारे हे उपस्थित होते. यंदा चे यंग अचिव्हर्स अवॉर्ड्स चे पुरस्कार्थी सुरश्री दसककर ,कुशल लोढा , गार्गी दिनेश वैद्य , कुणाल पवार , सारंग बुर्हाडे याना सन्मानित करण्यात आले.
१)सुरश्री दसककर यांनी संगीत व गायन क्षेत्रात खूप उत्कृष्ठ कामगिरी केली असून दसककर कुटुंबाची हि चवथी पिढी आहे , ती गायना बरोबर हार्मोनियम हि उत्तम प्रकारे वाजविते.
२) गार्गी दिनेश वैद्य हिने संपूर्ण भारतातील अनेक ग्रंथ , हस्तलिखिते यांचे डिजिटायझेशन तसेच मनुस्क्रिप्ट चे डिजिटायझेशन हि तिने केले आहे तिच्या या कामगिरी साठी तिच्या नावावर तीन जागतिक विक्रम असून वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डस् , अमेरिकन बुक्स ऑफ रेकॉर्डस् बद्दल तिचे अनेक सत्कार झाले आहेत , तिचा विजय भाटकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुद्धा सत्कार झालेला आहे.
३)सारंग संजय बुर्हाडे अवघा १८ वर्षाचा असून त्यानं गिटार आणि ड्रम वाजविण्याची कला स्वतः चे स्वतःच आत्मसात केली आणि आज तो इतक्या लहान वयात संगीत क्लास घेतो.
४)कुशल लोढा हा चार्टर्ड अकाउंटंट असून त्याने चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत देशात ५ वा क्रमांक पटकाविला होता ,त्याने सी एफ ए परिक्षेत विशेष प्राविण्य मिळावीत उत्तीर्ण झाला आहे .तो असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाइड अकाउंटंटचा जागतीक लेव्हल वर ३ ऱ्या क्रमांकात उत्तीर्ण झालेले असून सध्या तो आदित्य बिर्ला ग्रुप मध्ये वेंचर कॅपीटल व्हर्टीकलला कार्यरत आहे . समाजाला आपण कहीतरी देणे लागतो या हेतूने त्याने यू ट्यूब लिंक्ड इन या सोशिअल मीडिया प्लँटफॉर्म वरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतो आणि त्याचे लाखो फॅलोवर आहे. त्याने या माध्यमाद्वारे माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू , पद्मश्री टि.एम. मनोजरिं , हिरानंदानी चे एम डि निरंजन हिरानंदानी याच्या सारख्या दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या आहेत . लिंक्ड इन टॉप वाइस फॉर २०२२ हा सन्मान सुद्धा मिळालेला आहे .
या कार्यक्रमास शशिकांत पारख , संजय लोळगे , कपिल पाटील , सतीश मोरे , संजय अग्रवाल उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button