
राजूर /प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील जामगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली लोकनियुक्त सरपंच सुरेश दामू पथवे यांची निवड झाली तर उपसरपंच पदी अंकुश दादाभाऊ महाले यांची निवड करण्यात आली,
सदस्य पदी श्रीखंडू गणपत मेंगाळ, यशवंत शिवराम पथवे ,सौ वनिता विकास आरोटे ,सौ राणी सागर शेळके, सौ जयश्री दत्तात्रय पथवे ,सौ उषा बाळू पारधी यांची निवड करण्यात आली ग्रामपंचायत पदभार स्वीकारताना ग्रामसेवक दातीर मॅडम यांनी सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचा सत्कार केला ही निवड लोकनियुक्त सरपंच सुरेश दामू पथवे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली ,त्यावेळी निवडणूक निरीक्षक तालुका कृषी अधिकारी हासे यांच्या उपस्थितीत पार पडली
ग्रामपंचायत बिनविरोध प्रसंगी मार्गदर्शक मा. जगन्नाथ मुतडक , सामाजिक कार्यकर्ते , अजय कुमार महाले, विकासराव आरोटे बाळासाहेब बाबुराव आरोटे यांची भूमिका महत्त्वाची ठरली, त्याप्रसंगी विठ्ठल पथवे ,मिनानाथ मुतडक, बाळु महाले, मनोहर पथवे, नाना पथवे, दिलीप भाऊसाहेब महाले, यांचे सहकार्यातुन सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बिनविरोध निवडणूक पार पडली… पुढील वाटचालीसाठी सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.