जनशक्तीच्या वतीने मॉंसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानं जयंती साजरी!

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
गरिब रयतेच्या सुखासाठी स्वतंत्र स्वराज्य बनवावे ही आऊंसाहेबांची इच्छा होती. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, मात्र त्यासाठी त्यांना मॉं साहेब जिजाऊ यांनी प्रेरित केले. जिजाऊंनीच त्यांना स्वराज्याची वाट दाखवली. महाराष्ट्र जशी विरपुत्रांची भुमी आहे तशीच विर मातांची देखील आहे हे राजमाता जिजाउं मॉं साहेबांना पाहुन लक्षात येते असे प्रतिपादन प्रा.रामेश्वर पालवे यांनी शेवगाव येथे केले.
जनशक्तीच्या वतीने राजमाता जिजाऊ मॉं साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी ते बोलत होते.
श्री पालवे म्हणाले की, स्वामी विवेकानंद हे एक प्रभावशाली व अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. ज्यांनी जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा दिली होती. स्वामीजींची दृष्टी जगभरातील सर्व तरुणांसाठी एक मानक आहे. म्हणूनच त्यांना तात्विक प्रतिभावान आणि भारतातील उत्कृष्ट मनांपैकी एक म्हणून संबोधले जाते. म्हणूनच स्वामी विवेकानंदजी जयंती हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.
यावेळी ज्ञानेश्वर नागरे, जिजाऊच्या लेकी देवढे प्रतीक्षा, प्रिती निकाळजे, जाधव छाया यावेळी उपस्थित होते.