इलेट्रिक मोटारच्या चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना राजुर पोलीसांनी मुद्देमालासह केले जेलबंद

राजूर प्रतिनिधी
राजुर पोलीस स्टेशन हद्दीतील कुमशेत गावाचे शिवारातुन दोन इलेट्रिक पाण्याच्या मोटारी, स्टाटर, वायर चोरी झाले बाबत तक्रारी वरुन राजुर पोलीस स्टेशन गु.र.नं. 101/2022 भा.द.वी. कलम 379 प्रमाणे दि. 23/05/2022 रोजी अज्ञात आरोपींता विरुध्द गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्याचा तपास राजुर पोलीस करित असताना 1) संतोष पांडु कोकतरे, वय- 23 वर्षे, रा. जाणेवाडी, ता. अकोले, 2) गोपिनाथ दुंदा पोरे, वय- 22 वर्षे, रा. शिसवद, ता. अकोले यांनी सदरचा गुन्हा केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नमुद आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार खालील प्रमाणे साहित्य त्यांचेकडुन हस्तगत करण्यात आले आहे.
1) 12,000/- रु. किमतीची लक्ष्मी कंपनीची 3HP इलेट्रिक पाण्याची मोटार
2) 9,000/-रु. किमतीची लुबी कंपनीची 2HP इलेट्रिक पाण्याची मोटार
3) 3,000/-रु. किमतीचे मोटार चालु करण्यासाठी लागणारे इलेट्रिक स्टाटर
4) 70,000/-रु. किमती टिस्टर मोडल असलेली होंडा कंपनीची निळ्या रंगाची मोटार सायकल नंबर एम.एच. 02 सी.सी. 8207 जु.वा. कि.अं. एकुण 94,000/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री.मनोज पाटील सो. पोलीस अधिक्षक अहमदनगर, मा. श्रीमती स्वाती भोर मँडम, अप्पर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर व मा. श्री. राहुल मदने सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राजुर पोलीस स्टेशनचे अधिकारी स.पो.नि./नरेंद्र साबळे व अंमलदार पो.हे.कॉ./ विजय मुंढे, पो.हे.कॉ./ कैलास नेहे, पो.ना./दिलीप डगळे, पो.कॉ. पवार, पो.कॉ. संभाजी सांगळे, पो.कॉ./विजय फटांगरे, पो.कॉ./अशोक गाढे, पो.कॉ./अशोक काळे, चा.पो.ना./पटेकर यांनी केली आहे.