साडी, चोळी घालून पंचायत समिती समोर उपोषण!

गणेश ढाकणे
गेवराई प्रतिनिधी
==============================
सात महिने उलटले तरी आपल्या निवेदनाची दखल न घेतल्याने अर्जुन अंबादास ढाकणे यांनी गेवराई पंचायत समिती समोर साडीचोळी घालून अभिनव उपोषण आंदोलन केले
.
श्री अर्जुन अंबादास ढाकणे यांनी गेवराई तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी यासाठी 8/10/ 2019 रोजी गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले होते मात्र त्यांनी या निवेदनाची दखल घेतली नाही यामुळे अर्जुन ढाकणे यांनी गेवराई पंचायत समिती समोर साडीचोळी परिधान करून अनोखे उपोषण आंदोलन केले
14 व्या वित्त आयोगामधून जी कामे ऑनलाईन आहेत ती झाली नाहीत सन 2016 ते 2021. यात सत्तेचा गैरवापर झाला आहे.
*घरकुल योजने मधील 2014 व 2015 ड यादी झाली ती रद्द करून नवीन केली आहे, त्या मध्ये काहीनोकरदार लोकांची नावे आहेत,
- शौचालयाची जी कामे झाली आहेत त्याचे p. T. R नाही त्यांनी सार्वजनिक जागेवर बांधले आहेत * शोषखड्ड्याचे कामे बोगस झाले आहेत, त्यांनी बोगस पीटीआर दाखवून,, शोषखड्डा पैसे उचलले आहे.
- वडगाव ढोक मध्ये सहा विहीर आहेत,, पण ग्रामपंचायत कडे दोनच आहे, बाकी सगळ्या विहीर विकल्या आहेत
*, जिल्हा परिषद बीड कडुन गावातील पाण्यासाठी आलेले कूपनलिका ग्रामपंचायत यांनी वैयक्तिक गोठ्यामध्ये दिले आहेत त्याचे प्रमाणपत्र नाही व ग्रामपंचायतीला नोंद नाही
*, वडगाव ग्रामपंचायत 2017 ते 2022 या कालावधीमध्ये ग्रामसेवक गावांमध्ये आलाच नाही व ग्रामसभा झाली नाही अशा 16
मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं