रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने कोदनी येथे संयुक्त जयंती साजरी!

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील राजूर गावाजवळी मौजे कोदणी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच महानायक युवा संघ कोदणी च्या वतीने संयुक्त जंयती साजरी करण्यात आली
या वेळी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे ,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महाराष्ट्र चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बिरसा मुंडा माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार आर्पन करून आभिवादन करण्यात आले.यावेळे अकोले तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे ,अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे ,तसेच मिनाक्षीताई शेंगाळ,सह भारतीय ट्रायबल पार्टी च्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षा व प्रभारी सौ.डॉलीताई डगळे उपस्थित होत्या ,कोदणी गावचे माजी सरपंच व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विठ्ठल बांबेरे , विजय पवार ,देवराम बांडे,युवराज तळपे,सरपंच पांडुरंग मुठे शंकर वायाळ ,घाटघर विभाग प्रमुख प्रल्हाद शिंदे ,राजूर उपशहर प्रमुख मंगळा पटेकर समता सैनिक दलाचे अकोले तालुकाध्यक्ष अजय पवार ,तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते दिनकर बर्वे ,अविनाश पवार,राहुल पवार,तसेच आर पी आय चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारूळे ,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पवार ,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राकेश कापसे ,अकोले तालुका सचिव सुधीर पवार यांच्या उपस्थितीत संयुक्त जंयती चा कार्यक्रम पार पडला ,यावेळी तालुक्यातील महत्त्वाच्या नागरी व सामाजिक प्रश्नावर देखील चर्चा करण्यात आली तालुक्यातील दलित ,आदिवासी ,बहुजन समाजाने एकोप्याने रहावे असे आवाहन तालुक्यातील जेष्ठ नेत्यांनी आपले मत मांडले